पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२७ ४ स्थितिप्रकरण-सर्ग १५. भोगली. द्रव्यार्जनाच्या भ्रमामुळे ज्यांचा क्रोध व उद्योग काठण आहे अशा राजांचें व श्रीमानांचे दर्शन घेतले. मंदरावरील कुंजांमध्ये, प्रफुल्लित सुवर्णलतापंक्तीमध्ये कल्पतरूंची छाया व पुष्पे यांच्या योगानें रम्य झा- लेल्या मेरूच्या शिखरावर भटकलो. त्या अनुकूल व प्रतिकूल दशांमध्ये मी भोगलें नाहीं; पाहिले नाही व केले नाही असे काही नाही. आता मी सर्व ज्ञातव्य ( जाणण्यास योग्य असलेले ) जाणले आहे, व सर्व द्रष्टव्य पाहिले आहे. फार दिवसापासून थकलेल्या मला आता विश्राति मिळाली आहे. माझा सर्व भ्रम नाहीसा झाला आहे. बाबा, उठा. आपण मंदर- पर्वतावर जाऊं या व सुकलेल्या बनलतेसारख्या त्या माझ्या पूर्व तनूला पाहू या. वस्तुतः मला आता तिला पाहून काही सपादन करावयाचे नाही. केवळ नियतीची रचना पहाण्याकरिता मी हा विहार करणार आहे. एक आत्माच सत्य आहे, दुसरे काही नाही; असा माझा दृढ निश्चय झालेला असल्यामुळे मी आता अन्य जीवन्मुक्तानी सेविलेल्या अति शुभावह चार- त्राचेच सेवन करण्याचा स्थिर निश्चय केला आहे. त्यामुळे मी जरी तें शरीर पाहिले तरी त्याविषयी पुनः मोहात पडणार नाही. अर्थात् मूढा. प्रमाणे ' हे माझे आहे ' असा अभिनिवेश न करिता मी केवळ अवशिष्ट प्रारब्ध-भोगास अवश्य असलेला व्यवहार मात्र करीन १४. सर्ग १५-आपल्या शरीराची दुर्दशा पाहून शुक्र शोक करतो. त्याचे कारण व देहस्वभाव. श्रीवसिष्ठ-राघवा, त्यानंतर जगद्गतीचा विचार करीत ते तत्वज्ञ समंगेच्या तीरावरून निघाले. क्रमाने आकाशाचे आक्रमण करून मेघ- छिद्रातून निघून सिद्धमार्गाने एका क्षणात मदराच्या गुहेपाशी आले. तेथे झाडावरून गळून पडलेल्या पानामध्ये लोळत पडलेली आपली शुष्क तनु शुक्राने पाहिली व तो म्हणाला "बाबा, पूर्वी सुखसभोगाच्या योगाने तुम्ही जिचे लालन केलेत ती ही सुकुमार तनु आहे. धात्री जिला प्रथम सुवासिक तेल लावून व ऊन पाण्याने न्हावू घालून नंतर कापूर, अगरु, चंदन इत्यादिकांच्या कल्काचा लेप लावीत होती तीच ही माझी काया आहे. मेरूच्या उपवन-भूमीमध्ये मंदारपुष्पाची शीतळ शय्या तुझी जिव्याक' रितां रचित होता तीच ही माझी आकृति आहे. मत्त देवस्त्रीसमूहानें लालन केलेली ही माझी तनु नानाप्रकारच्या किड्यांनी भोके पाडल्यामुळे