पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२६ बृहद्योगवासिष्ठसार ज्याच्या सर्व प्रवृत्ती क्षीण झाल्या आहेत, ज्याचे सर्व भोक्तृत्व नष्ट झाले आहे, ज्याचे सर्व कल्पनाजाल नाहीसे झाले आहे, ज्याने महापदाचा (अमर्यादित आत्मसुखाचा) अवलंब केला आहे, सर्व इच्छा शांत झाल्यामुळे ज्याचा चित्त भ्रम भग्न झाला आहे, जो निर्विकल्पसमाधींत स्थित आहे, जो शीत-उष्ण सुख-दुःख इत्यादि वृत्तींपासून विरत झाला आहे, जो अनंत विश्रांतीचे स्थानच अशा आत्म्यामध्ये विश्राम पावला आहे, जो प्रतिबिंब न घेणाऱ्या स्वच्छ मणीप्रमाणे निर्मल झाला आहे, ग्राह्य व त्याज्य याच्या संकल्प- विकल्पापासून जो मुक्त आहे व ज्याची मति चागली आगी आहे आहे अशा महाधीमान् पुत्राला भृगूने पाहिले. कालानेही त्याला पाहून 'आता हा देहभा- नावर येवो' असे गंभीर ध्वनीने झटले. त्याबरोबर तो भगुपुत्र समाधि सोडून उठला व डोळे उघडून तो जो पुढे पहातो तो एकाच काळी उदय पावलेल्या चद्रसूर्याप्रमाणे ते दोघे (काल व भृगु) त्याला दिसले. हरिहराप्रमाणे मिळून आलेल्या त्या दोघा कातिमान् विप्रास त्याने आपल्या कदवपल्लवाच्या आसना- वरून उठून प्रणाम केला व परस्पर योग्य सत्कार करून, मेरूपर्वतावर जगत्पूज्य ब्रह्म-विष्णु-महेश जसे बसतात त्याप्रमाणे, ते तिधे जवळच्याच एका मोठ्या शिळेवर बसले व नुक्तीच समावि सोडून व्युत्थित झालेला तापस त्यांस असें शात व रम्य वचन बोलला.-तुमच्या दर्शनाने मला आज परम सुख झाले आहे. जो माझा मनोमोह शास्त्र, तप, धन व आत्मविद्या याच्या योगानेही नाहीसा झाला नव्हता तो तुमच्या पवित्र दर्शनाने झाला आहे. महात्म्याच्या दृष्टी जशा अतरात्म्यास तृप्त करतात तशा निर्मल अमृताच्या दृष्टीही करीत नाहीत. आपल्या चरणाच्या धुळीने या प्रदेशास पवित्र करणारे तुझी कोण ? हे मला कळले नाही. ___ असें बोलणाऱ्या त्याला भगु ह्मणतो-तूं कोण आहेस याची आठवण कर. कारण तूं आतां ज्ञानी ( जागा) झाला आहेस. अविद्या-निर्देत झोप घेत पडलेला नाहीस. भगूने अशी प्रेरणा केली असता त्याच्या पूर्व पुत्राने नेत्र मिटून ध्यान केले. त्याबरोबर सर्व कळल्यामुळे तो अतिशय आश्चर्यचकित झाला व गंभीर वाणीने ह्मणाला "जिचा आरंभ कळत नाही अशी ही परमात्म्याची नियति अचित्य आहे. तिचा जयजया असो. तिच्या योगानेच हे अवाढव्य जगचक्र चालत असते. आपये मला न कळतांच माझे अनेक जन्म झाले व त्यांत अनंत में