पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १४. सर्ग १४-काल व भृगु यानी समाधिस्थ शुक्राला जागे केले व पूर्व वृत्तांताचें स्मरण दिले. श्रीवसिष्ठ-राघवा, नंतर भृगु व काल मंदरावरून निघुन समंगा- नदीच्या काठी आले. पर्वतावरून उतरून येत असताना त्यानी सामान्य जनांच्या मनास हरण करणारी विचित्र सृष्टिशोभा पाहिली. आकाशच- रांच्या विविध गती व विलास, प्रफुल्लित वृक्ष, नानाप्रकारच्या वेली, त्याचा आश्रय करून राहिलेले व विविध क्रियामध्ये आसक्त झालेले असंख्य जातीचे अनेक प्राणी, नानाप्रकारच्या पशुजाती, त्याच्या विविध लीला, अनेक सरोवरें व त्यातील नानाप्रकारची कमले, अनेक जलचर प्राणी व पक्षी, मोठाल्या तरंगानी भूषित झालेल्या नद्या, अंतरिक्षातील विविध देखावे व असेच आणखी अनेक जल, स्थल व अंतराल प्रदेश यातील उद्वेग, विस्मय व आनंद देणारे पदार्थ त्याच्या दृष्टी पडले. त्याच्या अव- लोकनाने परमा म्याच्या अचिंत्य शक्तीची व त्याबरोबरच तिच्या मोह- कतेची चागली कल्पना झाली. प्राण्याच्या एकमेकाविरुद्ध अनेक क्रिया कशा चालत असतात व त्यामुळेच हा संसार भयकर व अति दुःखद कसा झाला आहे हे त्याच्या लक्षात आले. असो, अनेक नगरें, गांव, मोठमोठ्या राजधान्या, अनेक जातीचे, वर्णाचे, वेषाचे व अनेक विचित्र भाषा बोलणारे लोक, ग्राम्य पशू व पक्षी, वापी-कूप-उद्यानादि अनेक कृत्रिम पदार्थ इत्यादिकानी भरलेल्या पृथ्वीवर येताच ते थेट जेथें शुक्र तप करीत बसला होता त्या समगेच्या तीरावर गेले. तेथें भगर्ने अन्य देहात असल्यामुळे अगदीच निराळ्या आकाराने शोभणाऱ्या आप- ल्या पुत्राला पाहिले. त्याची सर्व इद्रिये त्यावेळी शात झाली होती. तो समाधीमध्ये स्थित होता. त्याचे मनोरूपी हरिण त्यावेळी चंचलता सोडून स्वस्थ बसले होते. फार दिवसांपासून झालेले श्रम घालविण्याकरितांच जणुं काय ते फार दिवस विश्रांति घेत होते. ज्याच्यामध्ये हर्ष व शोक यांची परंपरा लागलेली असते अशा व फार दिवस उपभोग घेऊन नुक्त्याच सोडलेल्या संसारगतीचे चिंतनच जणुं काय ते करीत होते. वेगाने फिरणारे चक्र जसे वेग क्षीण झाला असता शात होते त्याप्रमाणे अनंत जगदावर्तीमध्ये अतिशय फिरल्यामुळे कष्टी झालेलें तें जणुं काय आपो- मापच शांत झाले होते. असो; एकांतांत असलेल्या, रमणीय, तेजस्वी,