पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२४ बृहद्योगवासिष्ठसार. करितांच देहधारण करून या लोकी येतात. त्याचे उपदेश हीच शास्त्रे होत. ती ज्ञानसंपादन करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाच्या उपयोगी पडतात दुष्कर्मीचा क्षय झाला असता साधकाच चित्त शुद्ध होते व अशा शुद्धचित्त पुरुषाची निर्मल बुद्धि शास्त्रामध्ये प्रवृत्त होते. सच्छास्त्राचा चागला विचार केला असता मनोमोह नाहीसा होतो. क्षीण न झालेले मन मोह मात्र पाडते. ते सिद्धीच्या मुळीच उपयोगी पडत नाही. सर्व जीवाच्या सुख-दुःखाचे कारण हे मनःशरीरच आहे. मासमय शरीर नव्हे. पाचभौतिक मास-अस्तिसघातही मनःकल्पनारूप आहे. भगो, तुझ्या पत्राने मनःशरीराने स्वतःला जसे कल्पिले तसा तो झाला. त्यात आमचा काय अपराध आहे बाबा ? आपल्या वासनेने जीव जे जे कर्म करतो त्याचे त्याला तसेंच फळ मिळते. त्यात दुसन्याचे काही नाही. मनोवासनेनें केवळ अनुसंधानाच्या योगाने एका क्षणात केलेले कार्य आझाला मोठ्या प्रयत्नाने व पुष्कळ वेळानेही करता येत नाही. स्वर्ग, नरक, भोग, जन्म- मरणकल्पना इत्यादि सर्व मनाच्या मननाने निष्पन्न झाले आहे मननरूप मनाचे चलनही मोटे दु ग्वट असते. असो, उगीच अविक बोलून शब्दसंग्रह वाढविण्यात काय अर्थ आहे ? ऊट. तुझा पुत्र जेथे आह तयें जाऊ या, चल. तो चित्तशरीरानेच एका क्षणात सर्व स्वर्गभाग भागून या लोकी आला व विविध उच्चनीच योनीचा मनानेच भोग घेऊन आता समंगेच्या तीरी तप करीत राहिला आहे. असें सागून जगद्गतीला जणू काय हसतच असलेल्या कालाने आपल्या हाताने भृगूचा हात धरला असता भगवान् भृगुही 'अहाहा ! नियतीची व्यवस्था काही विचित्र आहे' असें हळुच ह्मणत उठला. एकाच वेळी उठलेल्या त्या दोघा तेजोनिधींच्या अगकातीने प्रकाशित झालेले अबर. तल रमणीय दिमृ लागले. श्रीवाल्मीकि-वसिष्टमुनि रामाला इतकें सागत आहेत तो सूर्यास्त झाला. त्यामुळे सर्व सभासद सभेतून उठून सायंतन विधि करावयास आपापल्या स्थानी गेले व दुसन्या दिवशी सूर्योदय होताच प्रातःकृत्ये आटोपून पुनः उपदेशामृताचे प्राशन करण्याकरिता मोठ्या आशेने सर्भेत येऊन बसले १३. येथे आठवा दिवस समाप्त झाला.