पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग १३. ५१३ काही अज्ञानाच्या योगाने अतिशय मूढ असतात; पण वृक्षादि स्थावरा- पेक्षा त्यांची योग्यता अधिक असते. कारण इष्ट वस्तूच्या ठायी प्रवृत्ति करून अनिष्टापासून निवृत्त होण्याची योग्यता त्याच्यामध्ये असते. शास्त्र- प्रतिकूल आचरण केल्यामुळे कित्येक जीव ब्रह्मसागरात फार दूरवर वहात गेलेले असतात. त्यामुळे त्याना मुक्ति मिळणे अतिशय कठिण होतें. केवल सत्त्वाचा आश्रय करून कित्येक देवत्वास प्राप्त होतात. जन्म-मरण- परंपरारूप संसारात फिरता फिरता कित्येक नरादिभावास प्राप्त होतात व संसरण करिता करिता अतिशय श्रम झाल्याकारणाने विश्राति देणाऱ्या योगभूमीचा आश्रय करितात. पण शास्त्रावलोकन करून ते वारवार सत्त्वाचा आश्रय करीत असले तरी कृतातरूपी वृद्ध उंदीर त्याची भूमिका वारंवार पोखरून त्यांना स्वार्थ साधू देत नाही. तथापि कृतांत असा वारंवार प्रतिबंध करीत असतानाही काही महाप्रयत्नशील पुरुप त्यालाही तुच्छ करून ब्रह्मतत्त्वमहासागराशी मिळून जातात. ते जीवन्मुक्त होतात. कित्येक अल्प- मोहयुक्त पुरुष ज्याचा पार मुळीच दिसलेला नाही अशा ब्रह्मसागराचा आश्रय करून रहातात. साराश अशा या चित्सागरावरील लहरीत कांहीं वरून खाली जातात, काही फारच उंच चढतात व कित्येक अगदीच नीच योनीत पडतात. बा साधो, परम पदाला विसरल्यामुळे सुख-दुःख- दायी जन्माची जणुं खाणच अशी ही जीवता उद्भवली आहे. पण गरु- डाच्या स्मरणाने जशी विषव्यथा नाहीशी होते त्याप्रमाणे ती परमपदाच्या ज्ञानाने विनाश पावते १२. __ सर्ग १३-मन शक्तीचे वर्णन करून शुक्रापाशी जाण्याकरितां भृगु व काल उठतात. काल-सागराच्या उर्मीप्रमाणे व वसंत ऋततील लताप्रमाणे अस- लेल्या या विचित्र व विविध भूतजातीतील जे प्राणी मनोमोहास जिंकि- तात ते कृतार्थ होत. त्याना तत्वसाक्षात्कार होतो. ते जीवन्मुक्त होऊन भ्रमण करितात. पण मनोमोहास न जिंकणारे दुसरे सर्व स्थावर-जंगम प्राणी, काष्ठे व भिंती यासारखे, मूढ असतात. तथापि त्यातलेही जे अज्ञ साधनचतुष्टयसंपन्न असतात तेच शास्त्रविचाराचे अधिकारी होत. ज्यांचा मोह क्षीण झालेला असतो ते नव्हेत. कारण ते अगोदरच कृतार्य झालेले असतात. ते शास्त्रोपदेशाच्या द्वारा अज्ञांवर उपकार करण्या