पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १ कारता " बरे आहे, आला तर येऊ दे," इतकेच बोलून जनक मुका- व्याने बसला. सात दिवस त्याने त्याची विचारपूस केली नाही. आठव्या दिवशी त्याने त्यास अगण्यात येण्यास सागितले तेथेही तो व्यासपुत्र गभीर मनाने सात दिवस राहिला. त्यानतर जनकाने त्यास अत पुरात पाठविले. त्या सुदर व तरुण व्यासमुतास नये तरुण व मुदर स्त्रियाच्या हातून नानाप्रकारचे भोजन घातले व अनेक मनोहर भोग्य पदार्थ देवविले. पण ते भोग व पहिल्या चवदा दिवसात झालेले ते कष्ट यातील एकानेही त्याच्या मनास विकारयुक्त. केले नाही ते परताप्रमाणे अचल होते. सर्व प्रसगी मौन धरून तो प्रसन्न चित्ताने राहिला. हा त्याचा प्रभाव पाहून जनकास आनद झाला. त्याने त्या पूर्ण चद्राप्रमाणे आपल्या तेजाने आह्वाद देणाऱ्या ब्राह्मणास जवळ आणविले व मनोभा- वाने वदन केले, आणि " हे दयासागरा, कृतकृयव नि स्पृह अशा आपले आगमन कसे झाले' आपल्या मनात काय आहे ? " असे विचारिले त्याबरोबर शुकाने वरील प्रश्नच न्याम केले जनकानेही व्यासाप्र माणेच उत्तर दिले ते ऐकून शुक हाणा ---राजन्, मी पुष्कळ विचार करून हेच पूर्वी ठरविले होते. पित्याला जेव्हा विचारिले तेव्हा त्यानही असेच सागितले आणि आता आपत्य नोडूनही मी तेच एकत आहे. शास्त्रामध्येही असेच वर्णन आढळते हा दुष्ट ससार आपल्या विकल्पामुळेच उत्पन्न झालेला असून तो विकल्पाचा त्याग केल्यानेच क्षीण होतो अर्थात् हा नि सार आहे, असा सर्व तत्त्वज्ञाचा अभिप्राय आहे. अनत मनोरथ व कर्मे याच्या वामना हेच या ससाराचे बीज आहे. या बीजाने भरलेले अत करण अव्याक़त नगमक ईशशक्तीत लोन होते. व्यष्टीचे अतःकरण लीन झाले असता सुषुप्ति होते व समष्टीचे अतःकरण लीन झाले अमता प्रलय होतो. अशाप्रकारच्या त्या बीजा- पासून अपचीकृत पचभूते, हिरण्यगर्भ, पचीकरणानतर विराट् , त्यानतर अन्नादि, त्यापासून व्यष्टि स्थूलदेह व व्यष्टि लिगदेह अशा रूपाने हा मोठा अनर्थ उद्भवतो. तो-कर्म व उपासना याचे एकाचकाली अनुष्ठान केले असता केवल व्यष्टिभावाचा नाश होत असल्यामुळे-समष्टि हिरण्य- गर्भरूपाने रहातो. श्रवणादि साधनाचा परिपाक होऊन तत्त्वाचा साक्षात्कार झाला असता वासना व अविद्या याचा नाश होतो व मूळाचाच