पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ११. ५१९ चित्त रागादि दोषांनी मलिन झालेले असल्यामुळे आम्ही अज्ञ आहों. देवा, तुझ्यासारख्या आत्मज्ञांची दृष्टि मलरहित असून त्या कारणानेच ते सर्व त्रिकालज्ञ असतात, नाना आकार-विकारांनी संपन्न असलेली व असत्य असूनही सत्य भासणारी ही जगस्थिति विद्वानालाही भ्रमांत पांडते. हे देव, गारुडाप्रमाणे मोह पाडणारें मनोवृत्तीचे रूपही तूंच जाणतोस. आम्हाला त्याचे ज्ञान होत नाही. मला दोन कारणानी पुत्राविषयीं व्यामोह झाला होता एक त्याला मत्युच नाही; तो अजरामर आहे, असे समजणे व दुसरे आयुर्मर्यादा क्षीण न होताच काळाने त्याला नेलें आहे, असें वाटणे. या दोन कारणानी चित्तभ्रम होऊन मी तुजवर क्रोध केला. ज्याना संसारगती ज्ञात झाल्या आहेत असे आम्ही संपत्ति व विपत्ति यांचा संबध झाला असता क्रमाने हर्ष व विषाद याच्या वश होतो. आपल्याशी जो प्रतिकूल आचरण करील त्याच्यावर क्रोध करावा व जो अनुकूल वागेल त्याच्यावर प्रसन्न व्हावे अशा प्रकारची ही नियति जगांत रूढ झाली आहे व ती हे इष्ट आहे व हे अनिष्ट आहे असा भ्रम असे- पर्यत कदापि क्षीण होत नाही. पण तत्त्वबोधानें तो भ्रम गेला म्हणजे प्रसाद व क्रोध याना अवकाश रहात नसल्यामुळे ती आपोआप क्षय पावते. भगवन्, तू नियतीचे परिपालन करणे एवढेच आपले कर्तव्य समजून त्याप्रमाणे वागत असतोस, हे न जाणता मी व्यर्थ तुजवर रागा- वलो. खरोखर या अपराधामुळे मी तुझ्या दडास पात्र झालो आहे. तुझ्या सागण्याप्रमाणे मी आपल्या मनोमय पुत्राला समंगेच्या तीरावर पाहिले व त्यामुळे-भूताची दोन शरीरें असून त्यातील मनोरूप सूक्ष्म शरीर सर्वगामि व सर्व जगास स्वसंकल्पाने निर्माण करणारे आहे-असें मला निःसंशय कळले आहे. __ काल-ब्रह्मन् , तुझें हे ज्ञान यथार्थ आहे. कुंभार संकल्पाने जसा घट बनवितो त्याप्रमाणे मन संकल्पानें शरीर बनविते. नसलेला आकार बनवून असलेला एका क्षणात कसा नाहीसा करावा हे त्याला चागले अव- गत आहे. मनाच्या मननामुळेच निर्माण झालेले त्रिभुवन अनिर्वाच्य आहे. न्याला सत् मणतां येत नाही व असतही ह्मणता येत नाही. चित्तदेहाच्या विस्तार पावणान्या अवयवरूप भेदवासनालतेपासून हा जगद्भेद झाला आहे. ( एकाद्या लौकिक वेलीला जसे फळ लागते त्याचप्रमाणे मनाच्या