पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. एक कल्पभर विद्याधर होऊन राहिला. नंतर महाबुद्धिमान् मुनिपुत्र झाला. पुढे मद्रदेशाचा राजा झाला व आता वासुदेव या नांवाचा एक तापस बालक होऊन समंगानदीच्या तीरावर तप करीत राहिला आहे. हे मुने, मी तुला हे त्याचे मुख्य मुख्य योनीतील जन्म सागितले आहेत. पण तो स्वर्गा- तून च्युत झाल्यापासून आपल्या वासनाबळाने दुसऱ्याही अनेक विचित्र व क्षुद्र योनीमध्ये फिरत होता. विविध देश, विविध अरण्ये, विविध लोक व या जगातील विविध योनी यांचा आजपर्यत यथेच्छ अनुभव घेऊन, विविध सुख-दुःखे भोगून व आता त्या सर्वांविषयीं अगदी विरक्त होऊन समगेच्या तीरावर बसलेला तो केवळ अध्ययनपरायण, जपपरायण, ध्यानपरायण व तपःपरायण झाला आहे १०. सर्ग ११-भृगु योगदृष्टीने पुत्रवृत्तात पहातो व त्याच्याविषयी विरक्त होतो. काल जगाची स्थिस्ति ह्मणजे शुद्ध मन क्रीडा आहे असे वर्णन करतो. काल-भगो, यावेळी तुझा पुत्र समगेच्या रम्य तरंगावरून 'सूं सू' असा ध्वनि करीत येत असलेल्या वायूकडून पवित्र होणान्या त्याच नदीच्या तीरावर तप करीत आहे. त्याने जटा ठेवल्या आहेत. त्याच्या हातात रुद्राक्षाची माळ आहे. त्याने सर्व इंद्रियांच्या विलासास जिंकलें आहे व अशा अवस्थेत तो तेथे आज आठशे वर्षे स्थिर तप करीत राहिला आहे. मने, पुत्राचा तो स्वप्नासारखा मनोभ्रम जर तुला पहावयाच असेल तर आपली ज्ञानदृष्टि उघडून पहा. श्रीवसिष्ठ-राघवा, भगवान् कालाने असे सागितले असता भृगूनें योगदृष्टया पुत्राचे चरित्र पाहिले. योगजन्य धर्मामुळे अतिशुद्ध झालेल्या बुद्धिरूप आरशात प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारा पुत्राचा वृत्तात त्याला तत्काल दिसू लागला. तो पूर्णपणे पाहून झाल्यावर भृगु समगेच्या तीरावर परतला व कालाच्या पुढे असलेल्या मंदरा- वरील आपल्या स्वस्थ शरीरात एका क्षणात परत आला. (या ठिकाणी समगेच्या तीरावरून परत येणे झणजे त्याचे चिंतन सोडणे असा अर्थ समजावा. कारण तो आपले शरीर सोडून तेथे गेला नव्हता. तर केवल योगजन्य दिव्य दृष्टीने त्याने आपल्या चित्तातच पुत्रचरित्राचा साक्षात्कार केला होता ) व ज्याचे पुत्रप्रेम पार नाहीसे झाले आहे असा तो मुनि कालाकडे विस्मित दृष्टीने पाहून म्हणाला " भगवन् , भामच