पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. सत्यही नव्हे व मिथ्याही नव्हे. कारण तात्विकदृष्टया विचार केल्यास चद्र त्या चलनाचा कर्ता आहे असें ठरत नाही. ह्मणून तो भकर्ता. पण व्यावहारिकदृष्टया त्याचे चाचल्य प्रत्यक्ष दिसते. ह्मणून तो चलनकर्ता. यास्तव त्यातील एकालाही सत्य किवा असत्य ह्मणता येत नाही. त्याप्रमाणेच कालरूप परमात्म्याचे सृष्टिकर्तृत्व व अकर्तृत्व अनिर्वाच्य आहे. ज्याच्या दृष्टींत दोष आहे त्याला दोरी जशी सापासारखी दिसते त्याप्रमाणे दोषी मन भ्रमाने कर्तता व अकर्तृता यांची कल्पना करते. यास्तव, मुने, रागावं नको. माझा काही अपराध नाही. आपत्तींचा हा असाच क्रम आहे. जगस्थितीचे तत्त्व काय आहे ते विवेकदृष्टया पहा, आझाला मिथ्या मान, पूजा इत्यादिकाची इच्छा नाही व मी असा आहे, तसा आहे. असें करतो, तसे करतो इत्यादि अभिमानही नाही ह्मणजे आह्मी राग, द्वेष, अभिमान इत्यादि दोषानी रहित आहों व सदा नियतीमध्ये स्थित असतो. तिचे उल्लंघन करून आह्मी कोणतेही कार्य करीत नाही. नं शाप द्यावयास तयार झाला आहेस असें पाहून आमी जे तुजपाशी आलों ते तरी तपस्वी मान्य आहेत या नियतीस अनुमरून होय. भयाने मुळीच नव्हे. जगत्पालक ईश्वराची इच्छा ही महा नियति असून तिच्या अनुरोधाने आपले नेमलेले कर्तव्य करणे, या स्वरूपाच्या अनेक अवातर नियती प्रवृत्त होत असतात. यास्तव महात्म्यास मान देणे ह्या नियतीच्या अनुरोधाने आमचे चालणे उचित असून तुझी क्रोध व अभिमानरूप तमोवृत्ति सर्वथा अनु- चित आहे. व्यवहार चतुरानी केवल नियत कर्तव्य करावे. आपापल्या उचित मर्यादेचे पालन करावे. तमोवृत्तीचा आश्रय करून मर्यादेचे उल्लघन कधीही करू नये. भृगो, अज्ञानमयी दृष्टि कोठे व धीरता कोठे? प्राज्ञाच्या या प्रसिद्ध मार्गात तूं आधळ्यासारखा मोहित का होतोस ! आपल्या कर्म- फलपाकामुळे उद्भवलेल्या दशेचा विचार न करिता (ह्मणजे प्राण्यास प्राप्त झालेली प्रत्येक दशा त्याच्या कर्माचे फळ आहे, या परम सिद्धांताचा विचार न करता,) सर्वज्ञ असूनही तूं एकाद्या मूर्खाप्रमाणे मला शाप देण्यास कसा उद्युक्त झाला आहेस? मने. सर्व प्राण्याचे विविध शरीर असते. देह हे एक व मन हे दुसरे. त्यातील पहिल्याला स्थूल व दुस- न्याला सूक्ष्म असें ह्मणतात. पण देह अत्यंत जड असून थोड्याचा निमित्तानेही नाश पावणारा आहे. मन शून्यरूप (प्रातिभासिक) सर्क