पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठमार. प्रियाही त्याच्या चित्ताप्रमाणेच अन्नरूप होऊन एका हरणाच्या पोटांत शिरली. तेथून वीर्यरूपानें हरणीच्या योनीत गेली. योग्यसमयीं तिची आई प्रसूत होऊन तिलाही हरणी झाली. मेरुपर्वतावर तप करीत बसलेल्या त्या ब्राह्मणपुत्राच्या सहवासाने ती गर्भवती होऊन तिला मनुष्याकृति पुत्र झाला. त्याच्या स्नेहामुळे तो पुनः मोहित झाला. हा माझा पुत्र आहे, असें ह्मणून तो त्याच्या सुखदुःखाने स्वतः सुखी व दुःखी होऊ लागला. या माझ्या पुत्राला धन मिळाले पाहिजे. याच्यामध्ये पुष्कळ गुण आले पाहिजेत, हा दीर्घकाळ वाचला पाहिजे. याचे सुंदर भार्येशी लग्न झाले पाहिजे. याला रहावयास योग्य घर पाहिजे. पुष्कळ उत्प- नाचे शेत पाहिजे इत्यादि अनेक चितानी व्याकुळ होऊन तो आपल्या स्वाभाविक सत्य स्थितीपासून च्युत झाला. तप, ध्यान, इत्यादि निष्ठे- पासून ढळला. धर्मचितनापासून भ्रष्ट झाल्यामुळे व पुत्राच्या भोग्यव- स्तूंची काळजी लागल्यामुळे त्याचे आयुष्य क्षीण झाले, तेव्हा सर्प जसा वायूला खातो त्याप्रमाणे मत्यूने त्याला प्रासले. भोगचिंतेसह त्याची चेतनाशक्ति शरीर सोडून गेली. त्यानंतर तो मद्रराजाचा पुत्र झाला. पुढे योग्य समयीं त्याला मद्रदेशाचे राज्य मिळाले. शचा उच्छेद करून त्याने आपल्या सपन्न राज्याचा उपभाग दीर्घकाल घेतला. शेवटी विविध भोग भोगणाऱ्या त्याला जरा आली. तेव्हा तप करावे या वासनेसह त्याने तें जर्जर झालेले शरीर सोडले, त्या अंत्यवासनेमुळेच तो एका तापसाच्या येथे जन्मास आला व मोठा होताच संमगानदीच्या तीरावर बसून तो महाबुद्धिमान् ब्राह्मण आनंदाने उत्तम तप करूं लागला. साराश, राघवा, याप्रमाणे भगुपुत्र शुक्र नानाप्रकारच्या वासनानी वासित होऊन व त्या वासनाप्रमाणे नानाप्रकारच्या जन्मदशेस प्राप्त होऊन आणि अनेक शरीरपरपरेचा अनुभव घेऊन शेवटी मोठ्या भाग्यवशात् वैराग्यादि उत्तम साधनाचा परम लाभ झाला असता विक्षेपशून्य होऊन सगमा- नदीच्या काठी वृक्षाप्रमाणे निश्चल राहिला ८. सर्ग ९-भृगूपाशी असलेले शुक्राचे शरीर सुकून धुळीत पडून राहिले. श्रीवसिष्ठ-याप्रमाणे पित्याच्या अग्रभागी बसून मनोराज्य करीत असताना शुक्राची पुष्कळ वर्षे निघून गेली. त्यामुळे वायु, ऊन, वर्षाव यांच्या योगानें जर्जर झालेला त्याचा देह तुटलेल्या वृक्षाप्रमाणे भूमीवर