पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सग ८. शीतळ झालेल्या प्रदेशांत संकल्पाने देवमंदिर निर्माण करून त्यांत तो तिच्या प्रिय हरिण बालकासह साठ वर्षे मोठ्या आनंदाने राहिला. क्षीर- सागराच्या तीरावर तो स्त्रीसह फिरत असतांना अर्धे कृतयुग संपले. चैत्ररथ उद्यानांत असंख्य लीलारचना केवळ सकल्पानेच करणारा तो काही वेळ कालाच्या साम्यतेस प्राप्त झाला. त्यानतर शुक्र पुनः इंद्राच्या नगरांत येऊन त्या हरिणनयनेसह तेथे मोठ्या सुखाने चतुर्युगाचे आट फेरे होत तो राहिला. इतक्यात त्याला पुण्य क्षीण झाल्यासारखे वाटले व ते मनांत येताच तो आपल्या दिव्य शरीरापासून च्युत होऊन प्रियेसह भूलोकी पडला. त्यांची सर्व अगे गळली, देवानी बलात्काराने त्याचा रथ नंदवनांतील वास, अलंकारादि उपभोगसामग्री इत्यादिकाचे हरण केले. त्याचे आनंदसाधन नाहीसे झाले. तो चिंतापरवश झाला. युद्धात मेलेल्या शूराप्रमाणे तो भूमीवर पडला. मोठ्या शिळेवर पडणाऱ्या पाण्याच्या मोठ्या धारेप्रमाणे दीर्घ चितेसह भूमीवर स्वसकल्पानेच कोसळलेल्या त्याच्या शरीराचे शेकडो तुकडे उडाले, त्याच्या बरोबर त्याच्या प्रियेच्या शरीराचीही तीच दशा झाली होती. तेव्हा ज्याचे देह छिन्न-भिन्न होऊन पडले आहेत अशा त्या दोघाचीही दुःखित चित्ते, ज्यांची घरटी नाहीशी झाली आहेत अशा दोन पक्ष्याप्रमाणे आकाशात फिरत राहिली. काही वेळाने ती चंद्राच्या किरणात शिरली. किरणाच्या योगार्ने ती दोन्ही दवरूप झाली. ( देवात येऊन मिळाली ). देवाच्या द्वारा साळीच्या भाताच्या अकुरात शिरली. तो मोठा होऊन त्याला कणीस आले. ते पिकले तेव्हा शेतकऱ्याने इतर शेर बरोबर त्यालाही कापन, झोडून व सडून ते तादुळ एका दाशार्ण देशातील ब्राह्मणास दिले. द्विजाने त्याचा भात करून खाला, तेव्हा भाताबरोबर भृगुपुत्र शुक्र त्याच्या पोटात जाऊन रस, रक्त, मांस इत्यादि क्रमाने त्याचे वीर्य झाला. त्याच्या उदरातून ग्राम्यधर्मद्वारा तो विद्वान् ब्राह्मणपत्नीच्या गर्भाशयात शिरला. तेथे तिच्या शोणिताने त्याचा स्थूलदेह बनला योग्यसमयीं तो जन्मास आला. मोठा झाला. मुनींच्या संगतीने त्याला तप करावे अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे त्याने उग्र तपास आरंभ केला. मेरुपर्वतावरील मयंकर अरण्यांत तो एक मन्वंतरभर तसेंच तप करीत राहिला. त्याची