पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१० बृहद्योगवासिष्ठसार. स्त्रीपुरुषांचा स्नेह परस्परास जसा आनंद देतो त्याप्रमाणे इंद्राचे त्रिभुवने- शत्वही सुख देत नाही. प्रभो, या पादस्पर्शानेच मी अतिशय तृप्त झालें आहे. हे सुंदरा, रात्री चंद्रकिरणांचा स्पर्श झाला असता कुमुदती (चंद्र- विकासीकमलभूमि ) जशी टवटवीत होते त्याप्रमाणे तुझ्या स्पर्शरूपी अमृतपानाने मी सजीव होत आहे. चरणावर लीन झालेल्या मला आलिं- गन देऊन आपल्या हृदयाशी घट्ट धर. राघवा, असे बोलून ती देवस्त्री मुनिपुत्राच्या अंगावर पडली. तिने त्याला आलिंगन दिले. अशा स्थितीतून, विषयपरवश न होता, धैर्याने, शुद्धमनाने व पवित्र देहाने निघणे फार कठिण आहे. तें खरें पौरुष सर्वच नामधारी पुरुषाचे ठायी नसते. त्यातूनही ऐन तारुण्यांत प्रायः त्याचा सर्वत्र अभावच असतो. असो; शुक्रही कामवश होऊन तिच्या प्रेमपाशात अडकून पडला ७. __सर्ग ८-विविधस्वर्गभोग भोगल्यावर शुक्र या लोकी आला व वासनावशात अनेक जन्म घेऊन शेवटी मोठा तापसी झाला. श्रीवसिष्ठ-रामचंद्रा, शुक्र याप्रमाणे चित्तविलासाने कल्पिलेल्या अनेक प्रियविषयाच्या योगाने दीर्घकाल सुख भोगीत तेथें राहिला. तो प्रियासमा- गम त्याला अतिशय आवडला. मंदारमाला धारण करणा-या व देवांच्या मझमृतासवानें मत्त झालेल्या तिच्या सहवर्तमान तो मत्त हंस, सारस त्यादि पक्षी व सुगधि सुवर्णकमलें यानी रम्य झालेल्या मदाकिनीच्या तटावर विहार करू लागला. चारण व किन्नर वेळोवेळी त्याची सेवा करीत असत. देवांचे अमृत त्याने यथेच्छ प्राशन केले. पारिजातलता- गृहांमध्ये त्याने तिच्याशी विविध विलास केले. शंकराच्या प्रमथांसह तो पुष्कळ फिरला. लहान लहान सुवर्ण कमलिनीच्या जाळ्यांनी भर लेल्या नदीत त्याने मत्त हत्तीप्रमाणे जलक्रीडा केली. कैलास पर्वतावरील वनात शंकराच्या मस्तकावरील चंद्राचा प्रकाश सतत पडत असे. त्यामुळे कृष्णपक्षांतही तेथील चांदण्यामध्ये बसून शंभूच्या गणाचें रम्य गायन ऐकत त्या विलासी ब्राह्मणाने तिच्यासह अनेक रात्री घालविल्या. गंध मादन पर्वताच्या उंच शिखरावर बसून तेथल्या सुवर्णकमलांनी त्याने तिल पायापासून मस्तकापर्यंत भूषित केले. लोकालोक पर्वताच्या विचि तटांवर त्याने तिच्याशी हसत क्रिडा केली, मंदरावरील जलमय व त्यामुळे