पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ७. ५०९ कांतमणी जसा आई होतो त्याप्रमाणे त्या दोघाचीही हृदयें प्रेमरसाने भतिशय भाई झाली. रात्रभर वियोगदुःख सहन करून प्रातःकाळ होतांच चक्रवाक-पक्ष्यांच्या जोडप्याची अगदी प्रथम गांठ पडली असतां जी अवस्था होते तीच त्या दोघाची झाली. प्रातःकाळी सूर्य व कमलिनी यांना जशी शोभा येते तशी त्यावेळी त्यांना प्रेमामुळे अवर्णनीय शोभा आली. नंदनवनातील तो प्रदेश मनांत आणलेली वस्तु तत्काल देणारा असल्या. मुळे शुक्राकरिता ती अप्सरा अतिशय विह्वल झाली. ती कामाच्या सर्वस्वी अधीन झाली. कमलिनीच्या पानावर मेघांतून जशा जलधारा पडतात त्याप्रमाणे तिच्या मृदु अंगावर अनेक स्मरशर पडले. मदवायने हालविलेल्या मजिरीप्रमाणे तिची अवस्था झाली. जिचे नेत्र नीलक- मलाप्रमाणे काळे व पाणिदार आहेत अशा हस व सारस पक्ष्याप्रमाणे गमन करणा-या तिला मदनाने क्षुब्ध करून सोडलें. तिची तशी अवस्था झाली आहे हे पहाताच शुक्राने अंधकाराचा संकल्प केला त्याबरोबर स्वर्गाचा तेवढा तो भाग तिमिराकुल झाला. तेथे काही एक. दिसेनासे झाले. वर्ततील अमावास्येस रात्री या लोकी जसा काळोख पसरतो तसा दाट काळोख तेथे पडला. पण लज्जेचे निवारण करणारा तो अंधकार त्या दोघाही कामी स्त्रीपुरुषाच्या फार उपयोगी पडला. ती दोघेच त्या काळोखात राहून तिच्या इतर सख्या तेथून दूर गेल्या. कामसंतप्त झालेली ती सुंदरी शुक्रापाशी आली. तेव्हा भृगुपुत्रानें रतिसु- सुखाला उचित अशा एका रम्य शय्यागृहाचा संकल्प केला. त्याबरोबर त्या काळोखातच सर्व उपकरणासह एक सर्वोत्तम स्फटिकमणिमय गृह उत्पन्न झाले. तेव्हा लजेने खाली मान घातलेल्या तिचा हात धरून तो भगुपुत्र त्यात शिरला. __त्यातील सुंदर पर्यकावर जाऊन बसल्यावर ती मधुरवाणीने त्याला बोलली "प्रिया, मला हा दुष्ट मदन अतिशय संतप्त करीत आहे. यास्तव हे नाथ, मज शरणागतेचे रक्षण कर, दीनाचे समाधान करणे हेच साधूंचे मोठे व्रत असते. स्नेहदृष्टीस न जाणणारे मूढ जसे प्रेमाचा अनादर करितात तसे रसज्ञ सज्जन करीत नाहीत. अकस्मात् एकमेकांवर आसक्त झालेल्या स्त्रीपुरुषाचे प्रेम देवांस जीवन देणान्या चंद्राच्या अमता- सही तुच्छ करून सोडीत असते. प्रथमतःच एकमेकांवर अनुरक्त झालेल्या