पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०८ वृहद्योगवासिष्ठसार. नांव ऐकत होतो. पण आता त्यांना प्रत्यक्ष पाहत आहे. वनलता जशा वनाची सेवा करितात त्याप्रमाणे त्या देवेद्राची सेवा करीत आहेत. हे समोर दिसणारे कल्पवृक्ष असावेत. कारण यांवर इंद्रनीलमण्याच्या समू- हाप्रमाणे पुष्पाचे गुच्छ आहेत, चिंतामणीसारखे कळ्याचे घोस आहेत व पिकलेल्या फळांच्या योगाने हे दाताळ असल्यासारखे भासत आहेत. हा महेंद्र येथे महासनावर बसला आहे. तो साक्षात् त्रैलोक्यस्रष्टाच असावा असे मला वाटते. या महात्म्याला आपण आता वंदन करावे, असा मनात विचार करून शुक्राने त्याला मनोरथरूपानेच नमस्कार केला. त्याबरोबर देवेद्र मोठ्या आदराने आपल्या आसनावरून उठला. न्याने मुनिपुत्राचा मोठा सत्कार केला व हात वरून त्याला जवळ आणून बसविले आणि हसत म्हटले "शुक्रा, तुझ्या आगमनाने हा स्वर्ग धन्य झाला आहे. तो पहिल्यापेक्षा अधिक शोभू लागला आहे. आतां पुष्कळ दिवस तू येथेच रहा." इद्राचे हे मधुर भाषण ऐकून शुक्राला मोठा आनद झाला. त्यामुळे त्याचे मुख फार शोभू लागले. निर्मल व पूर्ण चद्राच्या शोभेलाही त्याने तुच्छ करून सोडले. सर्व देव जेव्हा न्याला वदन करूं लागले तेव्हा तर इद्राच्या बाजूस बसलेल्या त्या भृगुनंदनाला अवर्णनीय सतोष वाटला. त्यामुळे तो पुष्कळ दिवस तेथेच राहिला व इंद्रालाही तो पुत्रादिकाप्रमा- णेच अतिशय प्रिय झाला ६. सर्ग ७-स्वर्गात शुक्राने आपल्या प्रियेला पाहिले. एकमेकाच्या अनुरागाने त्याचा समागम झाला श्रीवसिष्ठ--रामभद्रा, याप्रमाणे शुक्र आपल्या पुण्यप्रभावाने देवलो- कास गेला. मरणदुःखावाचूनच तो आपल्या पूर्वभावास विसरला. कांहीं वेळ इद्रापाशी बसून विश्राति घेतल्यावर तेथल्या अतिशय सुखाने हर्षित झालेला तो स्वर्गात विहार करावयास निघाला. स्त्रीजनास अत्यंत इष्ट असलेली स्वर्गशोभा पाहून, सारस पक्षी जसा नलिनीकडे जातो त्याप्रमाणे तोही तेथील स्त्रीसमूह पहावयास गेला. उपवनातील आम्रशाखेप्रमाणे त्या स्त्रीसघात असलेल्या आपल्या रमणीस त्याने पाहिले. तिनेही त्या भृगु- पुत्राला पाहिले. दोघे एकमेकाविषयी अतिशय उत्सुक झाली. कामदेवाने त्याच्या चित्तात पूर्णपणे प्रवेश केला. चंद्रकिरणाचा संसर्ग होतांच चंद्र-