पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०६ बृहद्योगवासिष्ठसार. मध्यभागी स्थित होता. (ह्मणजे तो पूर्ण विद्वानही नव्हता व अगदीच मूढ नव्हता. तर अंतरिक्षांत लटकणाऱ्या त्रिशंकूप्रमाणे त्याची स्थिति झाली होती) धड शहाणाही नाही व वेडाही नाही. एकदा त्याचा पिता निर्विकल्पसमाधीत स्थित असताना शुक्राने आकाशमार्गातून जात अस- लेल्या एका अप्सरेला पाहिले. मंदर पर्वतावर लोळणा-या लक्ष्मीप्रमाणे ती देवस्त्री सुंदर होती. तिच्या गळ्यात मंदारपुष्पाची माळ होती. मंद वायूच्या योगाने तिचे केस थोडथोडे हालत होते. तिच्या गळ्यांतील दिव्य पुष्पहाराच्या सुगधाने अतरिक्षातील सर्व वायु सुगधित झाला होता. ती जणुं काय लावण्यवृक्षाची कोमल शाखाच होती. मदाच्या योगाने तिचे नेत्र फिरून गेले होते व आपल्या शरीर कातीने तिने तो सर्व प्रदेश प्रकाशित करून सोडला होता असो; अशा प्रकारच्या त्या दिव्य स्त्रीला पहाताच शुक्राचे मन चचल झाले. पूर्ण चद्राप्रमाणे आह्लादकारक वाटणारे त्याचे गुग्व पाहून ती असराही परवश झाली. राघवा. स्त्री- पुरुषाच्या मनात कामप्रवेश झाला ह्मणजे ती दोघेही परस्परमय (ह्मणजे पुरुष स्त्रीमय व स्त्री पुरुपमय ) होत असतात; या न्यायास अनुसरून शुक्राचे चित्तही, सर्व विद्या व बोध यास विसरून, त्या अप्सरामय झाले १. सर्ग ६-शुक्र सनाने स्वर्गास गेला. इद्राने मोठ्या सन्मानाने त्याला जवळ बसवून घेतले. श्रीवसिष्ठ--रामा, मनाने तिचेच ध्यान करीत डोळे मिटून शुक्राने मनोराज्य चालविले. तो तेथे एकटाच होता. त्यामुळे त्याच्या मनोराज्यात काही विघ्नही आले नाही हा मी तिच्या मागून चाललो आहे ती स्वर्ग लोकास जात आहे. मीही तिच्या मागोमाग देवानी गजबजलेल्या स्वगोस येऊन पोचलो आहे आहाहा! मदु मंदार पुष्पाच्या माळा घातलेले व पातळ सुवर्णरसाप्रमाणे ज्याची अंगकाति आहे असे हे देव माझ्या मनाला फार आनंद देत आहेत अरे, हरणाच्या भितया पोराप्रमाणे आपले विशाल व काळेभोर नेत्र वारंवार फिरविणाऱ्या व पुरुषाकडे पाहून त्याच्या हृदयास विद्ध करण्याकरिता स्मित हास्यासह कटाक्षवृष्टि करणाऱ्या किती ह्या अप्सरा यथे आहेत!! ऐरावताच्या गंडस्थळावरील मदाचा स्वाद घ्यावयाचा सोडून हे खुळे भ्रमर येथील मधुर गायनावरच कसे लोलुप झाले आहेत पहा! जिच्यातील सुवर्णकमलावर चंचल झालेले ब्रह्म-