पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५. ५०५ असंभव आहे असे कळल्यावाचून मनाची शाति होणे शक्य नाही. 'हे आहे' असा मोह मनालाच होतो. मनच मरते व उत्पन्न होते. ते स्वचित. नाने बद्ध होते व स्वशुद्धीने मुक्त होते. चित्त मननाच्या योगाने वृद्धि पावले झणजे त्यात जगत् स्फुरते. यास्तव जग हा मनाचा धर्म आहे. त्यामुळे धर्मी मन नाहीसे झाले की, त्याचा धर्मही आपोआप क्षीण होतो. पुष्पाच्या गुच्छात जसा सुवास, तिळामध्ये जसे तेल, गुणी पुरुपामध्ये अथवा पदार्थामध्ये जसे गुण तसे चित्तामध्ये हे जग असते. सूर्याचे ठायीं जसे किरण, तेजामध्ये जसा प्रकाश, अग्नीमध्ये जशी उष्णता, बर्फामध्ये जसे शेत्य, आकाशात जशी शून्यता, व वायूमध्ये जशी चचलता तसे मनामध्ये हे जग आहे. पण मन मा व जग धर्म असल्यामुळे त्या दाघाचा जरी अभेद असला तरी धर्मी मनाचा क्षय झाला असता धर्मरूप जगाचा क्षय होतो. पण तेच वर्मरूप जगाचा अय झाला असता मनाचा क्षय कधीही होत नाही. यास्तव मनोनाशाकरिता प्रयत्न करावा. जगाचा- दृश्याचा-अत्यत अभाव आहे, ते र-जुसर्याप्रमाणे मिथ्या आहे, ते भ्रमरूप आहे, असे निश्चयाने समजणे हाच त्याच्या नाशाचा उत्तम उपाय आहे ४. सर्ग ५-भागवापारव्यान, गमुनि ममाविम्य असताना पर्वतावर खेळणा-या शुक्राला अप्सरा दिमली व तो नन्मय झाला श्रीराम-गुरुवर्य, बाहेर असल्यासारखा भासणारा हा ससार मना- मध्ये साक्षात् कसा दिसतो ते एकाद्या दृष्टातरूप इतिहासाच्या द्वारा मला समजावून मागा. श्रीवसिष्ठ-राघवा, ऐदव ब्राह्मण व लयण राजा याच्या इतिहासात मी हेच तत्त्व तुला मागितले आहे. तथापि जग मनामध्येच कमें स्थित भआहे, हे मी तुला भार्गवाच्या उपाख्यानाने पुनः मागतों. राघवा, पूर्वी भगवान् भृगु मदरपर्वनान्या पुष्पित वृक्षानी भरून गटल्या रम्य शिखरावर घोर तप करीत बमला होता. त्याचा तेजस्वी पण अल्पवयस्क पुत्र याक याची उपासना करीत असे. भगु सर्वकाल समाधि लावून, चित्राप्रमाणे अथवा शिळेवर खोदलेल्या प्रतिमेप्रमाणे निश्चल रहात असे. पण शुक्र तेथील आपोआप गळून पडलेल्या पुष्पाचा ज्यावर थर जमला आहे, अशा स्वाभाविक रूप्यमय व सुवर्णमय वेदीवर खेळत आपला काल घालवी. त्यावेळी तो विद्या व अविद्या या दोन दृष्टींच्या