पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५०४ बृहद्योगवासिष्ठसार. रमणीय चित्रे आहेत असे मानतो. त्याची दृष्टि बाह्य आकाराच्या पलीकडे जातच नाही. पर्वतावरील परमाण जसे असंख्येय असतात त्याप्रमाणे ब्रह्मरूपी मोठ्या मेरूवर असंख्य त्रैलोक्य-परमाणू भासतात, पाण्याबरोबर वहात जाणान्या असख्य मत्कणांसारखे अनत त्रैलोक्य-परमाणू चिदाका- शांत वहातात. भूताकाश शून्यरूप असतानाही त्याचा जसा नीलादि- रूपाने साक्षात् अनुभव येतो, त्याप्रमाणे हे चिदाकाश साक्षात् सृष्टिरूप दिसते. पण रामचद्रा, सृष्टीचे सृष्टिरूपाने ग्रहण केल्यास ती सृष्टीच जीवाला अधोगतीस पोचविते व तिला ब्रह्मरूपाने भोळखल्यास अत्यत हित होते. पण ते ब्रह्म तटस्थ (आपल्यापासून कोठे दूर व भिन्न ) आहे असे समजून उपयोगी नाही. तर जीवसज्ञक विज्ञानात्मा व विश्वाचे बीज ईश्वर यांचे शोधन केले असता त्या दोघाचे ऐक्य होते व तेच पूर्ण, चिंदकरस ब्रह्म आहे, असे समजले पाहिजे. यास्तव, हे सात्त्विका, ज्याच्यापासून हे सर्व झालें तें व जे झाले ते असे सर्व शुद्ध चिन्मात्र आहे, त्यात भेदाचा गंधही नाही, असा निश्चय कर ३. सर्ग ४.-विश्वाच्या स्थितांचे मूळ इद्रियासह मन आहे यास्तव मनाचाच उच्छेद झाला की जगही शून्य होते. श्रीवसिष्ठ-इद्रियसमुदायाचा विजय करणे, त्याना जिकणे हा भव- सागराच्या पार जाण्याचा सेतु आहे. त्यावाचून दुसन्या कोणत्याही उपायाने त्यांतुन निघता येत नाही. शास्त्र व संत्समागम याच्या योगानं विवेक उत्पन्न होतो आणि विवेकाच्या योगाने दुर्जय इद्रियानाही जिंकतां येते. इद्रियाना आत्मवश केले असता दृश्याचा अत्यंताभाव कसा असतो तें साक्षात् कळते. असो, सुंदर रामा, मी तुला हे संसारस्वरूप सागितले आहे. ससारसागराच्या पक्ती एकामागून एक उद्भवून लीन कशा होतात तें स्पष्ट केले. आता फार सागून काय करावयाचे आहे ? बाबारे, मन हेच कर्मवृक्षाचे मूळ आहे. यास्तव त्या मनाला तोडून टाकलें असतां कर्ममय जगवृक्षही तुटतो. मन हे सर्व आहे. यास्तव आतल्या आत त्याची शाति केली असता जगज्जालरूपी सर्व रोग नाहीसा होतो. देहाच्या संबंधाने होणारे सुख, दुःखही मनामुळेच अनुभवास येते. कारण मनाने हा मी व हे माझें असा निश्चयच जर केला नाही, तर कोठचा देह व कोठचे सुख-दुःख ? यास्तव मनःशांति हाच परम उपाय योजला पाहिजे. पण दृश्याचा अत्यंत