पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ३. रूपाने सत्य आहे असे म्हणण्यास कोणता प्रत्यवाय आहे ? तर सांगतो. स्मरण करणारा जर असला तर स्मृत्यादि सर्व मनःपरिणाम होणार ! पण परमात्मा असंग व उदासीन असल्यामुळे वस्तुतः स्मरणकर्ताच कोणी नाही. शिवाय तो 'अमनाः' म्हणजे मनोरहित आहे असे स्वतः श्रुतीने सागितले आहे. तेव्हा मनावाचून स्मरण कोणाला होणार ? साराश परमात्म्याची स्मृति आकाशवृक्षाप्रमाणे शब्दमात्र आहे. सृष्टीच्या आरभी पूर्व संस्कारामुळे स्मृति झाली असती, पण पूर्वसृष्टीतील प्रजापति प्रलय- समयी मुक्त होऊन जात असल्यामुळे स्मृतिकर्ताच रहात नाही. मग जगाची स्मृति व तिला कारण होणारे संस्कार कसे व कोठें रहाणार ? यास्तव पूर्व कल्पातील सर्गसुद्धा स्मतिरूप नव्हेत, तर जगस्थिति म्हणजे प्रौढ ब्रह्मचित्प्रभाच होय व ती मात्र सर्वदा असते. त्या चित्प्रभेला उद्देशूनच 'पूर्वी हे सर्व सत्च होते' इत्यादि श्रतिवचनें प्रवृत्त झाली आहेत. आदि-अतरहित सवित्प्रभाच जगदूपाने भासते. अनादिकाला- पासून नित्य सिद्ध असलेलें में ब्रह्मा, निज भान तोच ब्रह्माडाकाराचा उपादानभूत सूक्ष्म देह आहे ब्रह्मच सूक्ष्म व स्थूलभावाच्या भारोप- क्रमाने जगद्रप भासते. जगाचा स्वभाव अव्यवस्थित असत्यामुळेही त्याला स्वतः सत्ता आहे, असे म्हणता येत नाही. कारण लीलोपाख्या- नात वर्णिल्याप्रमाणे एका परमाणूमध्ये हे अवाढव्य त्रिभुवन भासते. त्या परमाणूत तसल्याच दुसऱ्या अवाढव्य जगाला धारण करणारा दुसरा परमाणु असतो. त्यात तसलाच तिसरा परमाणू अमतो व असेच उत्तरो- त्तर अनेक परमाणु एकात एक रहातात. तस्मात् असल्या अव्यवस्थित स्वभावाच्या जगाला वास्तविक समजू नये. तत्त्वज्ञाला सन्मात्रदृष्टि जशी स्वतः अनत वाटते तशीच अज्ञाला अनृत जगदृष्टीही अनत भासते. कारण त्यातील वस्तूची मख्या त्याच्याने करवत नाही. तत्त्वज्ञाला हे सर्व शात, केवल व अद्वय ब्रह्म भासते. पण अतत्त्व- ज्ञाला त्या ब्रह्माच्याच ठिकाणी भासुर त्रिभुवन दिसते. त्या ब्रह्माडात आणखीं अनेक ब्रह्माडे दिसतात. ज्याप्रमाणे एकाद्या लाकडी खावावर एक मोठी पुतळी खोदलेली असून तिच्या अगावर आणखी अनेक बाहुल्या कोरलेल्या असाव्या तशीच ही ब्रह्माडरचना आहे. तत्त्वज्ञ त्या खाबाकडे पाहून हे लाकुड आहे असे समजतो व अतत्त्वज्ञ ही अनेक निरनिराळी