पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०२ बृहद्योगवासिष्ठसार. नाही, त्याप्रमाणे जगातील वस्तूही कधी उत्पन्न होऊन नाश पावत नाहीत. निराकार आकाशामध्ये जसे निराकार आकाशभाग दिसतात. त्याप्रमाणे निर्मल आत्म्यामध्ये हे सर्ग आपोआप स्फुरण पावतात. जलाच्या द्रव- त्वाप्रमाणे, वायूच्या स्पंदाप्रमाणे, सागराच्या लाटांप्रमाणे, गुणी पुरुषाच्या स्वाभाविक गुणाप्रमाणे हे सर्व जग विज्ञानघन चिदात्म्याहून भिन्न नाही. अनंत व शात आत्मतत्त्वच जगद्रूपाने पसरले आहे. साराश, दाशरथे, सहकारी कारणांच्या अभावी जगत् शून्यरूप प्रकृतीपासून आपोआप होते हे ह्मणणे अगदी युक्तिशून्य आहे. यास्तव बा शिष्या, तू सर्व जगाचा अनुभव या स्वप्नाचा त्याग कर; सर्व विकल्प ही शय्या सोड व अविद्यारूपी दीर्घ निर्देतून जागा होऊन व तिला पळवून लावून जन्म, मृत्यु इत्यादि भयातुन पार निघून जा आणि उत्तमप्रकार जागा (प्रबुद्ध ) होऊन ब्रह्मज्ञांच्या सभेला भूषित कर २. सर्ग ३-जग ब्रह्मविवर्त आहे, ते ब्रह्मरूप आहे, ज्ञानी व अज्ञ या दोघाच्याही दृष्टीने ते अनंत आहे श्रीराम-गुरुवर्य, जगांतील इतर पदार्थाना जरी उत्पत्तिसमयीं कर्ता व इतर सहकारी साधनें याची जरूर असली तरी जगाच्या उत्प- त्तीला त्याची गरज असेल असे वाटत नाही. कारण जग हिरण्यगभीच्या मनःसंकल्पासून झाले आहे. त्यामुळे ते त्याच्या स्मृति अथवा संकल्पा- प्रमाणे आहे, असे आपणच मला सागितले आहे. स्मति व सकल्प याना सहकारी कारणाची मुळीच गरज नसते. यास्तव प्रलयसमयी प्रकृतीत लीन होऊन राहिलेलाच प्रजापति प्रथम स्मृतिरूप उत्पन्न होतो व त्याच्यामध्ये संस्काररूपाने सत् असलेले जगच स्मतिरूपाने व्यक्त होते, असें झटल्यास कोणता दोष येतो? श्रीवसिष्ठ-रामचद्रा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी क्षणभर कबूल केले, तरी प्रलयसमयीं जग असते असे ठरत नाही. कारण स्वप्न, मनोरथ, स्मृति इत्यादिकांचा विषय त्या त्या वेळीही जर सत् नसतो, तर तो त्यापूर्वी सत् कोठून असणार ? (सत् ह्मणजे विद्यमान ) आता तूं कदाचित् म्हणशील की, चित्रातील घोडा, मासाचा गोळा या रूपानें, जरी असत्य असला, तरी रंगाचा एक परिणाम या रूपाने जसा सत्य असतो, तसे जग बाह्य विकार या रूपाने जरी सत्य नसले तरी मनोविकार या