पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १. ४० उगवतात, व त्याची जोपासना कोणी न केली तरी ती आपोआप वाढ- तात. पण उत्तम आम्रवृक्ष, चदन इत्यादि जेथे तेथे उगवत नाहीत व उगवले तरी पुष्कळ जोपासनेनेही फळाम येत नाहीत. या ससारातील सार अति दुर्लभ आहे. त्याच्या प्राप्तीकरिता जे यशस्वी व बुद्धिसपन्न सत्पुरुप प्रयत्न करितात ते धन्य होत. दशरथनदना, तुजसारखा उदार व विवेकी पुरुप आजपर्यंत कोणी झाला नाही व पुढेही होईल की नाही, याची शका आहे. असो, हे मुनिवर्य, आता सर्वाच्या चित्तास आनद देणाऱ्या व विनयादि गुणानी परिपूर्ण असलेल्या या रामचद्राच्या प्रश्नाचे रत्तर देऊन आमास त्याच्या चित्ताचे समाधान केले पाहिजे, आणि हे सत्कार्य जर आमच्या हातून झाले नाही, तर आमचे ज्ञान व सिद्धि व्यर्थ आहेत, असे होईल." ३२, ३३. इति श्रीमन्छकराचार्यभक्तविष्णुकृत वृहद्योगवासिष्टसारातील पहिल वैराग्य- प्रकरण समाप्त झाले. अथ • मुमुक्षुव्यवहारप्रकरणम् । सर्ग १--शुक्राचार्यास आपत्यापाशी विचार वेत्य नेंच तत्त्वज्ञान झाले पण __ त्याचा त्यावर विश्वास बसेना, ह्मणून त्याना पित्यास विचारिले. त्यानेही तसेच मागितले. पण त्यावरही विश्वास बसेना; ह्मणून ते जनकाकडे गेले व त्यानेही तसेच सागितल्यावर त्याच चित्त सत्त्वात लीन झाले; इतका कथाभाग या सर्गात आहे श्रीगणेशाय नम । श्रीसरस्वत्यै नम । श्रीमच्छकराचार्यचरणारावेदाभ्या नमः । श्रीवाल्मीकि ह्मणतात –याप्रमाणे त्या सभेत आलेल्या श्रेष्ठ पुरु- पानी मोठ्या धीर व गभीर वाणीने सर्व मुनीस उद्देशून भाषण केले असता विश्वामित्र मुनि पुढे बसलेल्या रामास मोठ्या प्रेमाने ह्मणाले-- हे ज्ञानी पुरुषातील श्रेष्ठा, तुला जाणावयाचे असे काही राहिलेले नाही. आपल्या अलौकिक सूक्ष्म बुद्धीनेच तू सर्व रहस्य जाणले आहेस. अविश्वास, सदेह इत्यादि दोषामुळे तुझ्या बुद्धीवर जो थोडासा मळ बसला आहे, तेवढा मात्र आतां काढून टाकिला पाहिजे. कारण त्यामुळेच सच्चिदानद परमात्म्यास जाणूनही तुझ्या चित्तास समाधान होत नाही.