पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीः॥ अथ चतुर्थं स्थितिप्रकरणम् सर्ग १-जग मिथ्या व ब्रह्ममात्र आहे. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, उत्पत्ति-प्रकरणानतर आता हे स्थितिप्रकरण ऐक. याचे यथार्थ ज्ञान झाले असता निर्वाण प्राप्त होत असते. जगत या रूपाने स्थित असलेले हे सर्व दृश्य व त्याला पहाणारा ( द्रष्टा, अह) जीव भ्रातिमात्र व असन्मय आहे. हे एक कावाचून, रगाची अपेक्षा न करिता, शून्य आकाशात आपोआप उद्भवलेले चित्र आहे. यातील अनेक वस्तूना पहाणारे द्रष्टे जीवही दृश्य-कोटीत येत असल्यामुळे याचा द्रष्टाही कोणी नाही हे एक जाग्रदवस्थेत अनुभवास येणारे स्वप्न आहे. मनोरथाने बनविलेल्या नगराप्रमाणे याची रचना केवळ कल्पनेने झाली आहे. ज्याप्रमाणे मूढ पुरुप समोर असलेल्या गुजेन्या पुजक्याकडे पाहून तो अग्नि आहे अशी कल्पना करतात त्याप्रमाणे मायेने मोहित झालेले लोक सत् ला जगत् समजतात. पण ते जगत् असत् असूनही व्यावहारिक अर्थ (प्रयोजने) करू शकते. जलतरग-न्यायाने वस्तुत. ब्रह्माहून भिन्न नसतानाही भिन्न असल्यासारखे भासतें. मगजळाप्रमाणे हे असत्य असूनही सत्य भासते. हे स्वप्नात पाहिलेल्या पर्वतासारखे आहे. नीलवर्ण उपड्या कढई- प्रमाणे अनुभवास येणान्या या प्रसिद्ध भूताकाशाप्रमाणे हे वस्तुतः शून्य. रूप आहे. चित्रात काढलेल्या प्रफुल्लित उद्यानाप्रमाणे हे नीरस असूनही सरस असल्याप्रमाणे वाटते. चित्रातील सूर्य व अग्नीप्रमाणे हे प्रकाशरूप असल्यामारखा जरी भास झाला तरी ते निस्तेज आहे. मनोराज्यातील अनुभवाप्रमाणे ते स्वत. असत्य व फलतः अवास्तव आहे. पडद्यावर काढलेल्या कमलवनाप्रमाणे यात सार काही नाही. शून्यस्थानी हे नाना- कार झाले आहे इद्रधनुष्याप्रमाणे यातील काही हाती लागत नसले तरी त्याचा रम्य आकार अवश्य अनुभवास येतो. हे धुक्याप्रमाणे पसरलें आहे. कोणी याला केवल जडरूप म्हणतात, कोणी मायिक म्हणतात व कोणी शून्य समजतात; कोणी हे कालतः परमाणुयुक्त आहे आणि कोणी देशतः व कालतःही परमाणुरूप आहे, असे समजतात व कोणी केवल