पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ बृहद्योगवासिष्ठसार. या. आपण आज दशरथाच्या सुदर सभेस भूषित करू याः आकाशचरांचे हे भाषण सपत आहे तोच अतरिक्षातून मुनीची परपरा उतरली त्यात सर्वाच्या अग्रभागी नारद होते व शेवटी व्यास होते. भगु, अगिरा, पुलस्त्य च्यवन, उद्दालक, इत्यादि तेजःपुज मुनीची त्या सभेत दाटी झाली प्रत्येक मनीच्या अगावर मृगचर्म, एका हातात स्मरणी व दुसऱ्या हातात कमडलु होता. ते मुनि, हारातील मोतिकाप्रमाणे किवा गुरु-शुक्रादि ग्रहाप्रमाणे एकमेकास सुशोभित करीत होते. हा सर्व मुनिसघ भूतळी उतरला असता दशरथाची सर्व सभा एकदम उठून उभी राहिली. त्यावेळी ते स्थान नभश्वर व भूचर भाग्यवानाच्या योगाने भरून गेले. सवचिा मुखकमले आनदाने प्रफुल्लित झाली. दड, कमडलु, स्मरण्या, भस्म, जटा, चमें, माळा, वल्कले, पादुका इत्यादि धारण केलेल्या त्या ऋपीच्या पक्तीचे वसिष्ठ व विश्वा- मित्र या महिर्षीनी स्वागत केले. राजाने अर्घ्य, पाद्य, इत्यादि उपचारानी क्रमाने त्या सर्वाचे पूजन केले व करविले. परस्पर कुशल प्रश्न विचारिले व सर्व सभा पूर्ववत् स्थिर झाली. रामाने सर्व दिव्य मुनीस नमस्कार करिताच ते सर्वही धन्यवाद देऊन त्याची स्तुति करू लागले. सर्वास नमस्कार केल्या- वर राम विश्वामित्र, वसिष्ठ, वामदेव, नारद, व्यास, मरीचि, दुर्वासा, अगिरा इत्यादि श्रेष्ठ मुनी जेथे बसले होते, तेथे जाऊन नम्रपणे मस्तक लववून बसला. तेव्हा त्याच्याकडे पाहून ते सर्व वेदवेत्ते ज्ञानी महात्मे म्हणाले, "या बालकाने रमणीय व अति हितकर भाषण केले. त्यात उत्तम वाणीचे सर्व गुण होते. ऐकणाऱ्याच्या चित्तवृत्ति तल्लीन होऊन गेल्या होत्या. शेकडो मनुष्यातील एकाद्यासच आपल्या मनातील भाव वाणीने व्यक्त करिता येतो. रामा, तुजवाचून अशी अस्खलित व वैराग्यरसाने भरलेली वाणी उच्चारण्यास दुसरा कोण समर्थ होणार ? त्यातूनही परमार्थाविषयी बोल- णारे वक्त क्वचित्च आढळतात. आत्म्याच्या स्वरूपाकडे तिचा ओघ वळणे हे तर दुर्घटच होऊन राहिले आहे. मोठमोठे विकरीही रक्तमा- सादिमलिन धातूच्या या गोळ्यास आत्मा समजून त्याच्या उपासनेत आपले आयुष्य घालवितात, आणि त्यामुळे जन्म, मृत्यु, जरा, आधि व व्याधि याच्या परपरेत पडतात. अहो, हे मूर्ख ससाराविषयी विचार करीत नाहीत. पशूप्रमाणे जन्माचे जन्म व्यर्थ घालवितात. रामा, तुजसारखा सत्पुरुष कचित् एकादाच निपजतो. कांटेरी झाडे हवी तेथे व हवीं तितकी