पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशकाचे दोन शब्द वृहद्योगवासिष्ठसाराचा हा ( चतुर्थ व पचम प्रकरणात्मक) दुसरा भाग आज आम्ही, पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे, प्रकाशित करीत आहो. हा भागही अनेक मुदर कथानके व रम्य उपदेश याच्या योगाने किती उत्कृष्ट वठला आहे, हे प्रत्यक्ष पुस्तक वाचत्यावर वाचकाच्या व्यानात येईलच. आता या वासिष्ट महारामायणाचे निर्वाण-नामक एकच मोठे, पण हृदयगम प्रकरण राहिले आहे व ते लिहिण्याचे काम चालू आहे. लवकरच तो चरम भागही प्रिय वाचकाच्या हाती देऊन एकाच लेखकाने, एकाच शैलीने मपविलेल्या या मोठ्या प्रथाच्या प्रकाशनातून आम्ही पार पडणार आहो. तिसन्या भागाच्या शेवटी लेखक वे, शा. विष्णुशास्त्री बापट हे दोन परिशिष्टे जोडून त्यातील एकात या विस्तृत ग्रंथाचा मथितार्थ व दुसऱ्यात कठिण पारिभाषिक शब्दाचा अक्षरानुक्रमाने स्पष्टार्थ देणार आहेत, तरी वाचकानी आमची ही सेवा गोड करून घ्यावी.