पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ बृहद्योगवासिष्ठसार. कसा होणार ? असो; देह नष्ट झाल्यावर जीव कोठे जातो अणून मणशील तर सांगतो. नष्ट झालेल्या देहावरील अभिमान सोडून जीव प्रथम स्वप्रतिष्ठा- भूत परमात्म्यापाशी जातो. पण त्यास आत्मज्ञान झालेले नसल्यामुळे, मी परमात्म्याहून भिन्न भाहे व या सृष्टीतील हे सर्व पदार्थ परस्पर भिन्न आहेत अशा प्रकारची त्याची भेदवासना समूल नष्ट झालेली नसते. आणि त्यामुळे तो तात्काळ मुक्त होत नाही. जीवाचे स्वरूप औपाधिक आहे. अर्थात् उपाधि असेपर्यंतच तें असणार हे उघड आहे. काही काल रहाणाऱ्या वस्तु अनित्य असतात, हेही न्यायाने सिद्ध आहे. तेव्हा उपाधीचा नाश झाल्याकारणाने औपाधिक जीवाचाही जर नाश झाला तर यांत तुज नित्य आत्म्याची कोणती हानि आहे ? यास्तव सत्यत्वाची भावना कर. असत्य व भ्रातिमय अशा देहादिकाची भावना दृढ करूं नकोस. झणजे पूर्ण ब्रह्मभावनेने तृप्त झालेल्या तुला कोणत्याही मिथ्या वस्तूची इच्छा होणार नाही. साक्षिभूत, सम, स्वच्छ, निर्विकल्प व निरिच्छ भशा चिदात्म्याचे ठायीं त्याची इच्छा नसतांनाही जगाचे प्रतिबिंब पडते. आका- शाची इच्छा नसली तरी सुद्धा वस्तुस्वभावामुळेच त्यात जसें बिंबाचे प्रति- बिंब पडते तसाच हा सर्व प्रकार आहे. सूर्याच्या केवळ सांनिध्यामुळे जसा जगाचा व्यापार सुरू होतो त्याप्रमाणे केवल चित्सत्तेनेच हे जग निष्पन्न होते. दीपाच्या सत्तेने स्वभावतःच जसा प्रकाश पसरतो त्याप्र- माणे चित्तत्त्वाच्या स्वभावानेच जगाची स्थिति होते. शून्य आकाशानें या सर्वानुभवसिद्ध शून्य नीलवर्ण कटाहास ( कढईच्या आकाराच्या निळ्या भाग्छादनास ) जसें निर्माण केले आहे त्याप्रमाणे परमात्म्यापासून प्रथम उत्पन्न झालेल्या मनाने आपल्या विकल्पाने हे सर्व जग निर्मिलें आहे. त्यामुळे सकल्पक्षीण होऊन चित्त शात झालें कीं, ससारमोह नाहीसे होतात भाणि शेवटी एक, अज, आद्य, व अनंत चिन्मात्र अवशिष्ट रहाते १२९. इति श्रीशकराचार्यभक्त विष्णुकृत श्रीमहद्योगवासिष्ठसाराचें तिसरें उत्पत्तिप्रकरण समाप्त झाले. ३. श्रीकृष्णार्पणमस्तु