पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १२२. ४९५ मध्ये जसे कटकादि अलकार व अग्नीत जसे उष्णादि त्याप्रमाणे वासनानी मर्यादित झालेल्या ब्रह्मामध्ये हे त्रिभुवन आहे. ते त्याच्यापासूनच होते व त्याच्या आश्रयानेच रहाते. फार काय पण हे तेच आहे. सर्व प्राण्याच्य आत्म्यासच ब्रह्म ह्मणतात. त्याला जाणले असता सर्व जग ज्ञात होते. त्रिभुवनात ज्ञाता तेच आहे त्या सर्वव्यापी तत्त्वास, शास्त्रीय व्यवहार करिता यावा ह्मणून, चित् , ब्रह्म, आत्मा, इत्यादि नावें विद्वानानी योजिली आहेत विषय व इद्रियें याचा सयोग झाला असताही हर्षविषादरहित अशी जी ही शुद्ध अनुभूति ( अनुभव ) तोच अव्यय चिदात्मा होय. सर्व प्रिय व अप्रिय विषय मिथ्या आहेत, असा निश्चय झाला असता, दैवयोगाने जरी विषयेंद्रियसयोग झाला तरी चित्तात विकार उत्पन्न होत नाहीत. आत्म्यामध्येच जग पृथक् असल्याप्रमाणे प्रतिबिंबित होते. पण शुद्ध साक्षीस प्रतिबिबित जगाचे प्रियाप्रियरूपाने विवेचन करितां येत नाही. ह्मणून त्याच्या विवेचनाकरिता आत्मा व जग याहून निराळी बुद्धि त्याच्यामध्ये प्रतिबिबित होते व तीच हे प्रिय आहे, हे अप्रिय आहे इत्यादि विकल्प करून लोभ, मोह इत्यादि भावास प्राप्त होते. आत्मा त्या भावास कधीच प्राप्त होत नाही. जग, त्याविषयीची बुद्धि व लोभमोहादिक मिथ्या भेदाने आत्म्यामध्ये प्रतिबिबित होतात. ह्मणजे त्याचा भेद वास्त- विक नव्हे. तर परमार्थतः ते आत्मरूपच आहेत. यास्तव देहच मी आहे, असें जाणणाऱ्या मूढासच भय-विषाद इत्यादि होणे युक्त आहे. केवल चिदाकार अशा तुझ्या ठायीं त्याचा सभव नाही. पण असे असतानाही देहाभिमानशून्य असा तू देहजन्य विकाराच्या योगाने व्याकुळ होतोस हे आश्चर्य नव्हे का ? ज्याना आत्मज्ञान झालेले नसते त्याच्या शरीराचे तुकडे झाले तरी चिदात्म्याचा नाश होत नाही, मग ज्ञान्याच्या चिदाम्याचा नाश कसा होणार' चित्त सर्वत्र सचार करण्यास समर्थ आहे. सूर्याच्या निराधार मार्गातही त्यास प्रतिबध होत नाही व तेच शरीररूपी परीत रहात असल्यामुळे पुरुष होय. ससारी आत्मा तेच माहे. शरीर नव्हे. त्यामळे शरीराच्या नाशाने त्याचा नाश होत नाही. या विचित्र दुःखाचा तुला अनुभव येतो खरा, पण ती दु.खे अग्राह्य आत्म्याची नव्हेत. तर ती सर्व जड कोटींत अतर्भूत होणाऱ्या चित्ताची आहेत. कारण मनाचाही विषय न होणान्या आत्म्याशी मुखदुःग्वाचा सबध