पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ बृहद्योगवासिष्टसार व्यवहार करीत रहा. पण हर्षशोकयुक्त होऊ नको. कारण तू उपव- शून्य आत्मा आहेस. स्वयप्रकाश, शुद्ध, सर्वव्यापी व नित्य अशा तुला आत्म्यामध्ये सुख, दुःख, जन्म, मरण कोठून अमणार ? रामा, तू अबधु आहेस. तेव्हा तुला बधूकरिता तरी शोक कसा होईल , अद्वितीय आत्म्यामध्ये बधू रहाणार कसे? शिवाय बधू म्हणजे कोण? आपल्या सबधी जनाचे देह की आत्मे ! त्याचे देहच बधु आहेत व तेच शोकाह आहेत म्हणून म्हणावे तर भस्मीभूत देह परमाणूचा ढीग आहे व अचेतन अस- ल्यामळेच तो शोकाह नव्हे. बरे त्याचे आत्मे शोकाह आहेत म्हणून म्हणावें तर आत्मा एक व नित्य असल्यामुळे कोणत्याही काळी व देशी तो शोकाह होत नाही. रामा, तू अविनाशी असतानाही ' मी विनाश पावतों' असे खोटेच समजून व्यर्थ शोक करितोस. मृत्युशून्य आत्म्यामध्ये विनाश राह लागल्यास प्रकाशातही अधकार का नाही राहणार! घट फुटल्यावर घटाकाश नष्ट होत नाही, मृगजळाची नदी नाहीशी झाली असता सूर्याच किरण नाहीसे होत नाहीत, त्याप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी तू नेष्ट होणार नाहीस. तुझ्या चित्तात व्यर्थ इच्छाच का उद्भवते. अद्वितीय आत्मा दुसऱ्या कोणत्या वस्तूची इच्छा करणार ? राघवा, श्रवण करण्यास, स्पर्श करण्यास, दर्शनास, रस घेण्यास व हुगण्यास योग्य असे आत्म्यावाचून दुसरे काहीही या जगात नाही. त्या सर्व-शक्तियुक्त आत्म्यामध्ये, व्यापी आकाशातील शून्यतेप्रमाणे, सर्व शक्ती स्थित आहेत. अत्यत असत जगाच्या उत्पत्तीचे बीज चित्त आहे, हे मागें सागितलेच आहे. वासना- क्षय असेंही ज्याला ह्मणतात तो मन.शम (चित्तक्षय ) सिद्ध झाला असता कर्माचे वसतिस्थान अशी ही माया नष्ट होते. वासना ही ससार- चक्रास लाविलेली दोरी आहे तिला मोठ्या प्रयत्नाने तोडून टाक. ह्मणजे तें चक्र बद पडेल. महा मोहात पाडणाऱ्या मायेचे स्वरूप जोवर समजत नाही तोवर ती प्राण्यास भ्रमण करावयास लाविते. पण तिचे स्वरूप जाणले की, तीच अनत सुखरूप ब्रह्म देते. कारण ब्रह्मापासून झालेली ही ससाराचा उपभोग घेऊन, स्वलीलाभूत अशा ब्रह्मविद्येने ब्रह्माचे स्मरण करून ब्रह्मामध्येच लीन होते. तेजापासून जसे प्रकाश निघतात त्याप्र- माणे शिव, नीरूप, अप्रमेय व निरामय अशा आत्म्यापासून सर्व भूतें उद्भवतात. वृक्षाच्या पर्णामध्ये जशा शिरा, जलामध्ये जशा लाटा, सोन्या-