पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १२१. १९३ वासना दृढ करून क्रमाने मिथ्या बाह्य विषयांस तो विसरतो. दीर्घ- काल अभ्यास केल्यावाचून हे विषयविस्मरण स्थित होत नाही. (आतां तो अभ्यास किती दिवस करावा म्हणून म्हणशील तर त्याचा अवधि सांगतो.) समाधिस्थ असतांना, व्यस्थित अवस्थेत व मानभोजनादि बाह्य क्रिया करीत असतांनाही अभ्यासवशात् मन आत्म्यामध्ये क्षीण झाल्याकारणाने तें अनात्म्यास पहात नाहीं; रुचीने त्यांचे सेवन करीत नाही व त्यांचे सरण करीत नाही. तर वासना क्षीण झाल्याकारणाने मूढ ( बालक किंवा वेडा), अथवा नुक्ताच निजून उठलेला पण चांगला जागा न झालेला पुरुष याप्रमाणे केवळ दुसऱ्याच्या इच्छेने खान- भोजनादि करितो. सारांश अति सूक्ष्म ब्रह्मामध्ये ज्याने आपले चित्त अगदी मिळवून सोडलें आहे तो पदार्थाभावनासज्ञक सहाव्या योग- भूमीत मारूढ झाला आहे, असे समजावें. त्यानतर पूर्वोक्त प्रकारे चित्त ब्रह्मामध्ये लीन करून योगी काही वर्षे त्याच भूमिकेचा अभ्यास करीतो व परेच्छेनें स्नानभोजनादि करीत असतांनाही त्याविषयींची वासना सर्वथैव सोडितो आणि ही अवस्था अति दृढ झाली की, तो स्वतः तुर्यात्मा होतो. सहाव्या भूमिकेत चित्ताची ब्रह्माकारता स्थिर करण्याकरिता पुरुषास थोडासा प्रयत्न करावा लागतो. पण या सातव्या अवस्थेत ती स्थिति स्वभावसिद्ध होते. म्हणजे चित्ताच्या, ब्रह्माकारतेकरिता प्रयत्न करावा लागत नाही. या भूमीत आरुढ झालेलाच मुख्य जीवन्मुक्त होय. (पूर्वीच्या भूमीतही ज्यांस आत्म- साक्षात्कार झालेला असतो ते जीवन्मुक्तच असतात, हे खरे, पण केव्हां केव्हां प्रबल प्रारब्धामुळे त्यास इष्टानिष्टाचा अनुभव येतो. तसा या भूमीतील योग्यांस त्यांचा अनुभव येत नाही. कारण योगपरिपाक- जन्य पुण्यातिशयामुळे त्याचे प्रबल प्रालब्धही त्याच्या जीवनावांचून दूसरे काही करू शकत नाही. ) तो इष्ट वस्तूच्या प्राप्तीने भानदित होत नाही व अनिष्ट वस्तूच्या लाभाने दुखी होत नाही. तर निःशं- कपणे में प्राप्त होईल त्याचा समचित्ताने स्वीकार करितो. राघवा, तुझेही चित्त अत्यंत शुद्ध झाले आहे. तुला सर्व ज्ञातव्य (जाणण्यास योग्य असलेले ) ज्ञात झाले आहे व तुझी वासना सर्व कार्यापासून पारावृत्त झाली आहे. तूं सदा समाधिस्थ रहा अथवा लौकिक