पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ बृहद्योगवासिष्ठसार, असे समजणे हा उत्तम पक्ष व मागें तें होते, पण भाता तें मरून मिथ्या कल्पना करीत आहे, असे जाणणे हा गौण पक्ष होय. राघवा, निश्चय कर व त्यांतच स्थिर हो. आत्मा व चित्त यांच्या विषयी विचार केला असता चित्ताची सिद्धिच होत नाही. यास्तव तत्त्वतः तूं चित्तरहित आहेस. मग त्याच्या योगाने असे केश का भोगितोस. या चित्तरूपी असत् यक्षाने ज्यास आपल्या अधीन करून घेतले आहे त्या मुखोस चद्रातूनही अग्नीच्या वाला निघत आहेत, असे वाटेल. यास्तव चित्ताचा दूर त्याग करून तूं जसा आहेस तसाच स्थिर हो; मनन कर व ध्यानाने मुक्त हो. प्रथम तत्त्वबोधयुक्त होऊन मनाचा नाश कर. त्यानतर तत्त्वबोधानेच अमलात्मा होऊन संसारांतून पार हो. मी मनस्तत्त्वाच्या लाभाकरितां पुष्कळ दिवस विचार केला. पण शुद्ध आत्म्यामध्ये मला मनोरूप मलाचा लेशही आढळला नाही. तस्मात् या माझ्या अनुभवाचा विचार करून तू स्थिर हो १२१. सर्ग १२२-या सर्गात पुरुषाच्या ज्ञानभूमीच्या उदयाचा क्रम व रामाच्या शोक- मोहादिकांचे निरसन करून त्यास केलेला बोध याचे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ट--रामभद्रा, या ससारात उत्पन्न झालेल्या प्रत्येक पुरुषानें, याजन्मी अथवा पूर्वजन्मी केलेल्या निष्काम कर्माच्या योगाने चित्त शुद्ध झाले असता सत्सगमपरायण व्हावे. कारण, बा सज्जना, सतत ससार-प्रवाहात पडलेला हा जीव शास्त्र व सत्संग यावाचून अविद्या नदीतून पार होऊ शकत नाही. शास्त्र व सत्संग यांच्या संपर्काने त्याज्य काय आहे व ग्राह्य काय आहे याचा विचार पुरुषास होतो भाणि त्यामुळे तो शुभेच्छा नामक प्रथम भूमिकेत भारुढ होतो. त्यानतर विवेकवशात् तो विचारणेत प्रवृत्त होतो. त्या दुसन्या भूमिकेचाही काही काल अभ्यास केल्यावर त्या अधिकान्यास भात्म्याचे यथार्थ ज्ञान होते. त्याच्या योगाने त्याची अनात्मवासना भापोभाम क्षीण होऊन ससारभावमे- पासून मन पराङ्मुख होते. हीन तनुमानसा नामक तिसरी भूमिका होय. योग्याचे सम्यग्ज्ञान दृढ झाले की ताकाल सत्वापत्तिसज्ञक चतुर्थभूमि सिद्ध होते. सत्त्वापत्तीमुळे वासना भगदी क्षीण झाली म्हणजे तो योगी कर्मफलाने बद्ध होत नाही व म्हणून ध्यास असंसक्त असे म्हणतात. ही पाचवी भूमिका सिद्ध झाल्यावर सर्वदा अतर्मुख राहून व "मी ब्रह्म माहे" अशी