पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग ३२,३३ ४७ माझें कोणी नाही व मी कोणाचा नाही. तैलरहित दीपाप्रमाणे मी शान होणार. याप्रमाणे बोलून दशरथसुत रामचद्र स्वस्थ बसला. २८-३१. सर्ग ३२, ३३-या सर्गात, रामाचे भाषण ऐकणारास आश्चर्य वाटलें; देवादिकांनी भानदाने पुष्पवृष्टि केली; सर्व आकाशगामी सिद्ध दशरथाच्या सभेत उतरले व उचित स्थानी बसल्यावर त्यानी रामाच्या भाषणाची प्रशसा कोल. इतका कथाभाग आला आहे. त्या राजकुमाराचे हे प्रवाहासारखे चाललेले भाषण ऐकून सभेतील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्याना हर्ष झाला. त्याच्या अगावर रोमाच आले. वसिष्ठविश्वामित्रादि मुनि, जयत-धृष्टि, इत्यादि मत्री, दशरथ व इतर राजे, अयोध्यावासी जन, माडलिक राजाचे पुत्र, वेदवेत्ते ब्राह्मण, सेवक वर्ग, पिजऱ्यातील पक्षी, खेळावयाचे हरिणादि पशु, घोडे. जाळीच्या पडद्यात बसलेल्या कोसल्यादि स्त्रिया व तेथील इतर सर्व प्राणिमात्र यानी दुसरे सर्व व्यापार सोडून, डोळ्याची पातीही न हालविता व श्वास मोठ्याने न सोडता चित्राप्रमाणे निश्चल होऊन ते मनोहर व मोहनाशक भाषण ऐकले. आकाशातून फिरणाऱ्या सिद्धादिकानींही ती उदार वाणी ऐकली. रामाचे भापण सपताच आनदित झालेल्या विद्या- धरादिकानी त्या भाग्यवान् कौसल्यानदनावर पुष्पवृष्टि केली. सभेतील लोक तोंडे वर करून पुष्पवृष्टि कोण करीत आहे, ह्मणून पाहू लागले. पण त्यास कोणी दिसले नाही अलौकिक पुष्पानी ते सभास्थान मात्र भरून गेले. हा चमत्कार पाहून तर त्याच्या आश्चर्यास सीमाच राहिली नाही. याप्रमाणे अर्धी घटिका वृष्टि होऊन, ती शात झाली असता, सभेतील लोकास हे पुढिल आलाप ऐकू आले. आम्ही सिद्ध- गण आज जवळ जवळ कल्पभर या अंतरिक्षात चोहोकडे फिरत आदों पण असले, कर्णास तृप्त करणारे भाषण आजपर्यंत आमच्या कानावर कधी आले नाही. रघुकुलातील या रमणीय बालकाने विरुक्त मनाने उच्चारलेली ही वाणी बृहस्पतीसही बोलता येणार नाही. खरोखर आमचे महद्भाग्य उदयास आल्यामुळेच आम्हास हे वागमृत प्राप्त झाले. रामाच्या या सतोष देणाऱ्या वाणीने आम्हास एकदम बोध झाला. वसिष्टादी मह राघवाच्या पवित्र प्रश्नाचा निर्णय करतील व तो ऐकणे अति अवश्य आहे. यास्तव अहो नारद, व्यास, पुलह, इत्यादि मुनिवये, सर्व मुनिसघास घेऊन सत्ता