पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १२१. साम्य नसल्यामुळे त्याचा सबंध होणे दुर्घट आहे. तस्मात् पाषाणादि जड आहेत, असे आह्मास समत नाही. चित्च पाषणदिरूप आहे, जग मिथ्या असतानाही ते मिथ्या आहे असें न समजणे हाच चिच्चमत्कार होय व त्यात निमग्न झालेल्या पुरुषास हे विश्व कोट्यवधि भ्रमानी भरलेले आहे, असे वाटते. असो, रामा, कुभादि मृत्तिकेचे विकार जसे केवल मृन्मय असतात त्याप्रमाणे त्रिजगत्ब्रह्ममात्र आहे. द्रष्टा, दर्शन, दृश्य, इत्यादि त्रिपुटींत साक्षि- चैतन्य अनुस्यूत असते. त्या त्रिपुटीने रहित चैतन्य हेच परतत्त्व होय. जाग्रत्, म्वप्न व निद्रा या तिन्ही अवस्थानी रहित अशा तुझें जे सनातन रूप तन्मय होऊन तू सदा रहा. त्या रूपास अचेतनही ह्मणता येत नाही व चेतनही ह्मणवत नाही. शिलेचे हृदय जसें निश्चल असते तसेच ते रूप निश्चल असते. पण शिलाहृदय व ब्रह्मरूप यांमध्ये जाड्य व अजाड्य एवढाच कायतो विशेष असतो. राघवा, तु समाधिस्थ असलास तरी व व्यवहार करीत असलास तरी तन्मय होऊन रहा आत्मा देहात असतानाही कशाची इच्छा करीत नाही व कोणाशी द्वेष ठेवीत नाही. हे जाणून तुं स्वस्थ व नि:शक रहा. भ्रमाने देहव्यापारात पडू नकोस. पुढे होणाऱ्या एकाद्या पदार्थामध्ये जसा चित्ताचा आसग नसतो त्याप्रमाणे वर्तमान पदार्थाचे ठायींही मिथ्यात्वदृष्टि सपादन करून त्याचे ठायीं आसग ठेवू नये. असे केल्याने पुरुष आत्मरूप होतो. दूर देशात असलेला पुरुष जसा असून नसल्यासारखा असतो अथवा काष्ठपाषाण इत्यादि पदार्थ जवळ असूनही अचेतन असल्यामुळे आसगाभिमानास अयोग्य असतात त्याप्र- माणे चित्त असून नसल्यासारखें व आसगाभिमानास अयोग्य आहे, असे तू जाण. कारण आत्मस्वरूपाने विवेचन करून पाहिले भाता चित्तरा- हित्याचाच ज्ञान्यास अनुभव येतो. पाषाणात जसें जल नसते व जलांत अग्नि नसतो त्याप्रमाणे आत्म्यामध्ये चित्त नसते. मग परमात्म्यांत कोठून असणार ? निरूपण करू लागले असता जे काहीएक नाही, व त्याच्या योगाने जे झाल्यासारखे वाटते, ते खरे नव्हे. शुद्ध आत्म्याने अशुद्ध चित्ताचें अनुवर्तन करणे मुळीच उचित नव्हे. कारण अनात्मभूत अशा त्याचे अनुकरण करू लागल्यास प्रत्यंतदेशांतील म्लेच्छांचे अनुकरण करण्यास कोणता प्रत्यवाय आहे ! तस्मात् रामा, तू या चित्तोडालास आपल्या समीप येऊ देऊ नकोस व मातीच्या मूर्तीप्रमाणे स्वस्थ रहा. चित्त नाहींच