पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १२१. .४८९ कल्पित आहेत, असें विस्तृत दृष्टीने पाहिले झणजे अनुभव, स्मृति इत्यादि ज्ञानाचे पोटभेदही वस्तुतः मिथ्या ठरत असल्या कारणाने त्याविषयी फारसा विचार करण्याचे कारण नाही. स्वप्नात मी भोजन करून तृप्त झालों आहे; व दूर कोठे देशांतरी गेलो आहे असे वस्तुतः भुकेने व्याकुळ झालेल्या व कोठेही न जाता एकाच ठिकाणी स्थिर असलेल्या प्राकृत पुरुषालाही वाटते. पूर्वी घडलेला वृत्तांत पुनः स्वप्नात जसा दिसावा त्याप्रमाणे विध्य पर्वतावरील चाडालाच्या प्रामात घडलेला हा व्यवहार राजाच्या चित्तांत व्यक्त झाला. किंवा लवणानें जो भ्रम पाहिला तोच चांडालनामांतील स्त्रीपुरुषाच्या चित्तावर आरूढ झाला. हे एक विचित्र गौडबगाल आहे. भिन्न भिन्न स्थळी व काळी रहाणाऱ्या कवींचें एकादें काव्यरूप वचन जसे शब्दतः व अर्थतः अगदी एकसारखे असते त्याप्रमाणे लवण व चाडाल याच्या भ्रातिरूप स्वप्नाची एकवाक्यता झाली, असें तू समज. पण तसल्या व्यवहाराची गति अत्यत असत् नसते; कारण अधिष्ठानभूत चैतन्याच्या सत्तेनेच सर्व वस्तु सचायुक्त होतात. त्यांना स्वतत्र सत्ता नसते. सवेदनसत्ताच भृत, वर्तमान व भविष्य प्रपचांत प्रविष्ट होऊन जलांतील तरंगाप्रमाणे अथवा बीजातील वृक्षाप्रमाणे त्या सवेदनाहून निराळी आहे, असे वाटते. पण त्या संवेद- नेतर सत्तेचे सत्त्व व असत्त्व याचा निर्णय होत नाही. कारण ती दोन्ही (म० सत्त्वासत्त्व ) भ्रातिसवेदनाच्या अधीन असतात. परतु थोड्याशा विचारानें, रेतीत तेलाचा जसा अभाव असतो त्याप्रमाणे, आत्म्याचे ठायीं वस्तुतः अविद्येचा अभाव आहे, असें ध्यानात येते. अविद्या व आत्मतत्त्व याचा संबध होणे शक्य नाही. कारण एकसारख्या योग्यतेच्या वस्तूचा सबध होत असतो, असाच सर्वत्र अनुभव येतो. आतां लाख व काष्ट या असदृश पदार्थांचा संबंध होतो, असे दिसते खरे; पण त्यांचे उदाहरण येथे घेता येत नाही. कारण ते दोन्ही पदार्थ एका अविद्येचेच स्पद ( विलास ) आहेत. झणजे जड आहेत. त्यामुळे चेतनाने केल्यासच त्याचा संबंध होणे शक्य आहे. पण अजड आत्मतत्त्व व जड अविद्या याच्यामध्ये फारच वैलक्षण्य असल्यामुळे त्यांचा संबंध त्रिकाली होणार नाही. बरें सर्व चिन्मयच आहे असे जर मानले तर पाषाणादिकही जशा प्रकारे चिन्मय झालेले असतात तशाच प्रकारे त्यांचा व चैतन्याचा संबंध