पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८८ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-रामा, तिचे तें करुणारसप्रधान वर्तमान ऐकून राजास मोठा चमत्कार वाटला. तो आपल्या मत्र्यांच्या तोंडाकडे वारंवार पाहून त्या वृद्ध चांडाळीला नानाप्रकारचे प्रश्न विचारूं लागला व आपण भ्रमा- वस्थेत पाहिलेले सर्व सत्य आहे, असा त्याने निर्णय करून घेतला. नतर दयाई चित्ताने तेथील सर्वांस, अन्नवस्त्रादि इष्ट पदार्थ पुरवून, संतुष्ट के- ल्यावर काही काल तेथे राहून तो तेथून परत फिरला व नियतीच्या विचित्र गतीविषयी मनांत विचार करीत आपल्या नगरास येऊन पोचला व नगरवासी लोकांनी ज्याचा सत्कार केला आहे असा तो आपल्या गृहांत प्रविष्ट झाला. दुसन्या दिवशी सभा भरवून त्याने " हे स्वप्न खरें कसे झाले?" असा मला मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला व मीही त्याचे समाधान केलें. राघवा, याप्रमाणे ही अविद्या भयकर मोह पाडणारी आहे. अविद्येमध्ये सर्व संभवते. स्वन-भ्रमामध्ये घटाचे ठायीं पटाचाही भास होतो भारशात प्रतिबिंबित झालेल्या पर्वताप्रमाणे स्वप्नांत दूरचा पदार्थही समीप दिसतो. गाढ निद्रेत थडीच्या दिवसांतील मोठी रात्रही जशी अगदी थोड्या अवकाशांत सपल्यासारखी वाटते त्याप्रमाणे दीर्घ- कालही भ्रमात अगदी शीघ्र जातो. स्वप्नात असंभवनीय वाटणारे आपले मरणही सभवनीय होते. आकाशातून जाणे-येणे, स्थिर भूमीचे भ्रमण, पर्वताचे नृत्य इत्यादि सर्व भ्रमावस्थेत सुघट आहे. वासनायुक्त चित्त जशी जशी भावना करिते तसे तसे ते पहाते. हा सर्व प्रतिभास आहे. त्याच्या योगानें क्षणही कल्प होतो व असतही सत् होते. तात्पर्य अविद्या विषय-भ्रम उत्पन्न करिते. कधी ती सवादी भ्रम उत्पन्न करिते व कधी विसवादी. व्यवहारात सवादी भ्रमास सत्य ह्मणतात व विसंवादी भ्रमास मिथ्या ह्मणतात. लवणाचा भ्रम सवादी होता. त्या चांडाल-वाड्यात पूर्वी कोणा एका पुरुषाने चांडालकन्येशी विवाहादि केला व त्याचें तें वृत्तच राजाच्या मनात जसेच्या तसे स्फुरलें. भापणास जी अनेक स्वप्में पडतात त्यांतही काही विसवादी असतात व काही सवादी असतात. (संवादी लणजे सत्य ठरणारे व विसंवादी हणजे असत्य ठरणारे.) आपण चित्तक्रियेचा भनुभव घेऊनही तिला विसरतो. मणजे अनुभविलेल्या गो- ठीचे विस्मरण होते. त्याचप्रमाणे न अनुभविलेल्या गोष्ठीचे स्मरण होणेही फारसें अशक्य किंवा दोषास्पद नाही. कारण सर्वच चित्तवृत्ति आल्यामध्ये