पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १२१. १८७ पोरीला व तिच्या नवऱ्याला काळाने माझ्यापासून कसे ओढून नेले ? अरे माझ्या फुटक्या दैवा, अतःपुरातील स्त्रियांस सोडून जणुं काय तो कोणी राजपिडच अकस्मात् येथे आला व माझ्या कन्येशी विलास करूं लागला. पण तें तुला आवडलें नाही. दोघांचा एकाच कालीं नाश झाला. एका श्रेष्ठाचा चाडालकन्येशी सबध करविणान्या ससारनदीतील तरगाकार कमानी आपल्या तुच्छतेस सीमाच नाहीसे करून सोडिले आहे. मज मदभागिणीस धिक्कार असो. मजवर एकाच किती दुःखे पडली आहेत पहा, धनी मेला, गुणी कन्या व चिंतामणीसारखा जावई गेला. नात- वडाची काय वाट झाली आहे, ईश्वर जाणे. मी दरिद्री झाले; वाईट देशात जन्म घेतला, सर्व आयुष्य सकटात घालविले, हीन जातींत उपजले; मी साक्षात् भय आहे, महा आपत्ति आहे, विधात्याने क्रोध, शोक, दुर्भाग्य इत्यादिकाचे आश्रयस्थानच मला केले आहे, यात सशय नाही. अशा अवस्थेत यापुढे जीवत रहाणे हेच मरण असून मरणे हेच जीवित आहे. राघवा, अशाप्रकारचा अर्थ ज्यामध्ये भरला आहे असा विलाप करीत असलेल्या तिला पाहून राजाने आपल्या बरोबरच्या दासीकडून तिचे थोडें सात्वन करवून तिला सर्व वर्तमान विचारिलें. तेव्हा नेत्रा- तून अश्रुधारा चालल्या असतानाच तिने आपला सर्व वृत्तात त्या करुणानिधीस सागितला. पुष्कसघोष असे या गावाचे नांव असून माझा चाडाल पति येथे रहात होता. त्याला एक सुदर कन्या होती. तिला दैवयोगाने देवासारखा पति मिळाला. तो एकाएकी येथे आपण होऊन आला होता. माझ्या लाडक्या मुलीने त्याच्या सहवासात पुष्कळ दिवस घालविले. ऐहिक सुख भोगिले. मुले, बाळे झाली व या वनात आम्ही त्याची जोपासनाही केली १२०. सर्ग १२१-पुढील वृत्तात ऐकून आश्चर्यचकित झालेला राजा आपल्या नगरास परत आला. व वसिष्टाच्या वचनावरून त्याने या सर्व चमत्काराचा निर्णय करून घेतला, असें या सगोत सागतात. चांडाली-राजा, काही कालाने या प्रामांत भयकर दुष्काळ पडला. त्यामुळे अनेक जीव प्राणास मुकले. येथील प्रायः सर्व लोक, अन्नकष्ट असह्य झाल्यामुळे, जीव घेऊन दुसऱ्या कोठे जावयास निघाले. पण त्यातील बहुतेक मार्गातच मेले. येथे या सगळ्याजणी मजप्रमाणेच अति- शय दुःखी आहेत.