पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८६ बृहद्योगवासिष्ठसार. तिचे स्वरूप स्वभावतःच वाईट होते व त्यांतून दुष्काळाचे कष्ट सोसून तर ते अधिकच विचित्र झाले होते. तिचे डोळे खोल गेले होते. गालाची हाडे बाहेर येऊन बोधरे तोड अतिशय विद्रूप दिसत होते. हातापायाच्या काड्या होऊन मासरहित चामडी लोबत होती. पिकलेल्या तिच्या केसाचे तर वर्णनच करवत नाही. बोलताना व रडताना मध्येच दोन्ही हातानी ओरपून त्यास ती जर्जर करीत असे. अगावरील मळाची पुटे तिच्या दुर्भाग्याची, न बोलताच, साक्ष देत होती. असो, तिच्या मुलीच्या व जावयाच्या दुर्दशेची वार्ता तिला नुक्तीच कळल्यामुळे ती त्याच्याकरिता यावेळी रडत आहे व सभोवारच्या तिच्या मैत्रिणी तिचे समाधान करण्या- करिता आल्या आहेत, असे तिच्या पुढील भाषणावरून राजास समजले. ती ह्मणाली-अगे माझे बये, तीन दिवसात तुला अन्न मिळाले नाही व त्यामुळे तू अतिशय भागलीस, तुला फार कष्ट झाले, पतीबरोबर देशातरास जात असताना तुला मार्गात एका झाडाखाली ग्लानीची निद्रा आली व तुझी पोरें तुझ्या अगावर येऊन लोळू लागली. इतक्यात तुझा तो प्रियपति तुला सोडून कोठे गेला. अन्नकष्टामुळे ज्याचे देह क्षीण झाले आहेत अशा तुला, मुलाना व आम्हालाही पाहून त्याचा जीव व्याकुळ हात असे व तुम्ही त्याला प्राणाहूनही प्रिय होता. पण असे असताना तो तुम्हास सोडून कसा गेला ! अरे माझ्या जावया, बाळा, तू कुटुब पोषणाकरिता काय काय करीत होतास. डोगराच्या उच कड्यावर असलेल्या ताडाच्या झाडावरही चढून तू ताडगोळे काढीत असस. खाली उतरताना दोन्ही हात झाडास धरण्याकडे गुतून जात व त्यामुळे ताडफळे कोठे ठेवावी असा तुला विचार पडे. पण तू त्याचे देठ दातात धरून भराभर खाली उत्तरस. एकादे वेळी उतरताना तुझे हातपाय सुटल्यास तू जवळच्या लहान ताडाच्या झावळ्यास धरून काही वेळ वादरासारखा लोंबत रहास व आपला तोल सावरला म्हणजे पायानी त्याचे काड धरून हळु हळु खाली येऊन उभा रहास. पण आतां तुझी ती साहसी कमें मला कोठून दिसणार ? झाडीतून लपत लपत फिरणाऱ्या तरसास पाहून ओरडत वेगाने त्याच्या मागे धावणाऱ्या तुझें धैर्य खरो- खरच विलक्षण होते. काय सागू , माझ्या बयेचा व याचा जोडा रति- मदनाच्या जोड्यासारखा माझ्या मनास आनद देत होता. माझ्या