पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८५ ३. उत्पत्तिप्रकरण-लर्ग १२०. चंद्राप्रमाणे असलेल्या या जगात सत्यता कोठून असणार ? विचाररूपी प्रखर अग्नीने अविद्यारूपी फार दिवसांच्या घेलीस जोंकर ससूल जाळून टाकिलें नाहीं तोवर ती सुखदुःखरूप विविध विस्तार करीत रहणारच, हे तू विसरूं नको, झणजे झाले ११९. सर्ग १२०-लवणाने पुनः जाऊन ते चाडाळाचे बन पाहिले व बांडाल जातीच्या सासूशी भाषण केले, असे येथे सागतात. वसिष्ठ-रामा, सोन्याच्या मुद्रिकात्वाप्रमाणे ब्रह्माचे विश्वत्व आहे. म्हणजे सोन्यामध्ये मुद्रिकात्व जसें आरोपित त्याप्रमाणे ब्रह्माचे ठायीं विश्व आरोपित आहे, हे मी तुला आतांच सागितले. पण अविद्या मिथ्या आहे, असें सागितल्याबरोबर तिचे महत्त्व कसें चमत्कारिक रीतीनें क्षीण होऊ लागते ते ऐक. लवण राजा तशाप्रकारचा तो भ्रम पाहून दुसऱ्या दिवशी ते अरण्य पाहण्याकरिता निघाला. “ मी ज्या अरण्यात तें दुःख पाहिले त्याचे मला चांगले स्मरण आहे. यास्तव ज्याचे संस्कार चित्तात दृढ झाले आहेत ते अरण्य विंध्याचलावर गेल्यावर कदाचित मला सांप- डेल " असे मनात आणून सचिवासह तो दक्षिणमार्गाने निघाला आपल्या चतुरग सैन्यासह तो यावेळी निघालेला असल्यामुळे पुनः दिग्विजयाक- रताच तो येत आहे, असे इतर राजास वाटले. जाता जाता तो विंध्य- पवेतावर येऊन पोंचला व चोहोंकडे मोठ्या कौतुकानें फिरू लागला. शेवटी त्यास ते भरण्यही सापडले. त्यात शिरून पूर्वी अनुभविलेले अनेक प्रदेशादि पाहिल्यावर त्यास मोठे आश्चर्य वाटले. तेथील परिचित लोकास त्याने ओळखिलें. तो आणखी पुढे गेला. तो त्यास त्याच्या सासन्याचा गांव लागला. चार घटिका झालेल्या भ्रमात त्याने पाहिलेले ते सर्व लोक, स्या स्त्रिया, त्या झोपड्या, तीच भूमि, वृक्ष, इत्यादिकास अगदी बरोबर ओळ- खून तो क्षणभर देहभान विसरला. तेथें दुष्काळ पडल्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार झाला होता. कोणी पुत्राकरिता, कोणी कन्येकरितां, कोणी मातेकरितां, कोणी पित्याकरिता, कोणी पतीकरिता व कोणी इतर आता- करितां रडत होते. कोणी कोणी तर भापल्या शारीरिक व्यथेमुळेच दुःखी होऊन हाय हाय करीत होते. सासन्याच्या अगदी घराजवळ गेल्यावर अंगणांतच दुसऱ्या पुष्कळ वृद्ध स्त्रियांमध्ये बसून व डोळ्यांत पाणी आणुन आपले दुःख सागत असलेली वृद्ध सासू व्यास दिसली.