पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११९. ४८३ दोरीमध्ये सर्पभ्रम होतो. पण शिप व दोरी यामध्ये रुप्याचा एकादा कण ___सर्पाचा थोडासा अशही नसतो. त्याचप्रमाणे सोन्यामध्ये मुद्रिकादि अलकाराचा अथवा ब्रह्मामध्ये चराचराचा अशही नाही. पण अलकारात जसें सोनें त्याचप्रमाणे चराचरात ब्रह्म अनुस्यूत आहे. चराचर जग जर मिथ्या आहे तर त्याचा अगदी व्यवस्थित व नियमित व्यवहार कसा होतो मिथ्या जलाने खरी तहान कशी भागते, ह्मणन विचारशील तर त्याचे उत्तर (याच प्रकरणात पूर्वी दिले आहे तरी पुनः) सागतो. जी सत्य वस्तु असते तीच अर्थक्रिया करू शकते व जी असत्य असते ती अर्थक्रिया करू शकत नाही असा काही कोठे नियम नाही.तर सत् किवा असत् यातील जी वस्तु चित्तावर आरूढ होते ती अर्थक्रिया करू शकते. चित्तारूढ झालेला मिथ्या सर्पही कपादि अर्थक्रिया करू शकतो, हे प्रसिद्ध आहे. तस्मात् असत् व प्रतिष्ठाशून्य अशा अहभावाची कल्पना करणे हीच परम अविद्या, हीच माया व हीच ससृति ( ससार ) होय. सुवर्णामध्ये मुद्रिकात्वादि जसे असत् त्याप्रमाणे आत्म्याचे ठायीं अहत्वादि असत् आहे. शुद्ध, शात व आनद अशा परमात्म्याचे ठायी सनातनता, विरिचिता, ब्रह्माडता, पुत्रता, लोकातरता, स्वर्गता, मेरुता, देवता, असुरता, मनस्ता (.मनस्त्व ) देहता, व महाभूतता यातील एकही भाव नसतो. तीन काल, भाव- अभाव, त्वत्ता, अहता, आत्मता, अन्यता, सत्ता, असत्ता, इत्यादि सर्व अविचारामुळे उद्भवणाऱ्या व दृढ होणाऱ्या भावना आहेत. जगाचे पारमार्थिक रूप शात, शिव, अनामय ( उपद्रवर- हित ) अनामक व अकारण आहे. ते सत् नव्हे व असतही नव्हे त्याला मध्यावस्था नाही व अत्यावस्थाही नाही. ते असग असल्यामुळे सर्वरूप नव्हे. पण सर्वाचे अधिष्ठान असल्यामुळे सर्वरूपही आहे. साराश त्याच्याविषयी मनाने चितन करवत व वाणीने काही बोलवत नाहीं तें शून्याहून शून्य व सुखाहून सुख आहे. ( याप्रमाणे श्रीवसिष्ठानी निष्प्रपच व परमार्थकारण ब्रह्माचा बोध केला. तरी त्या ब्रह्मामध्ये आपली चित्तवृत्ति स्थिर करण्यास असमर्थ असलेला राम त्याच्यापासून पराडमुख होऊन पुनरपि जगाचे भान होणे, या विपरीत भावनेने भयभीत होत्साता प्रश्न करू लागला)