पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ बृहद्योगवासिष्ठसार. होऊन व आपल्या ब्रह्मत्वास विसरून मी जीव व सुरवा-दुःखी आहे असें ह्मणून रडू लागतो. श्रीराम-सोन्याच्या ठायीं मुद्रिकाभ्रांति कशी होते ? व त्याचप्रमाणे आत्म्याचे ठायीं अहता कशी उद्भवते ? श्रीवसिष्ठ-रामा, सत् व असत् याचा सबध त्रिकालीही शक्य नसल्यामुळे व उत्पत्ति, अस्तित्व, वृद्धि, क्षय इत्यादि भाव सत्-वस्तूच्या आश्रयानेच होणे शक्य व युक्त असल्यामुळे सद्रूपच सुवर्ण अथवा ब्रह्म मुद्रिका व अहता या वेषाने उत्पन्न होते, असे ह्मणावे लागते. शिवाय त्याग व ग्रहण या क्रियाचा सबधही सद्वस्तूशीच असतो. कारण बाजा- रात सोन्याची मुद्रिका विकावयास नेली असतां विकत घेणारा व देणाराही सोन्याची किमत देतात व घेतात. मुद्रिकेची किंमत देत किवा घेत नाहीत. कारण मुद्रिका ह्मणजे एक विशेष आकार. त्याची किमत जरी काही आहे असे हटले तरी ती सोन्याच्या मानाने अगदीच अल्प असणार हे उघड आहे. अर्थात् आपली अगठी विकणारा ती करावयास जी दोन-चार आणे मजुरी लागली असेल ती घेऊनच अगठी कधीही विकणार नाही. ह्मणजे मुद्रिकेचा व्यापार होत नसून सोन्याचा होतो. त्याचप्रमाणे सर्व व्यवहाराचा विषय ब्रह्म आहे. घट, पट, पुस्तक, लेखणी, इत्यादि त्याचे आकार नव्हेत. आता--तू ह्मणशील की, सुवर्णच जर सर्व क्रय-विक्रयादि व्यापाराचा विषय आहे तर मुद्रिकेचा आकार व तिचे मुद्रिका हे नाव याचे सुवर्णाहून निराळे कोणते स्वरूप आहे! तर त्याचे उत्तर थोडक्यात असे आहे-मुद्रिकेचे सुवर्णातिरिक्त स्वरूप व नाव ही विचार करीपर्यत रमणीय वाटतात. तत्त्वाविषयी विचार करू लागले की ती दोन्ही वध्यापुत्राप्रमाणे होतात. यास्तव मुद्रिकात्व ही व्यर्थ भ्राति आहे. केवल अविचार-काली असणे हेच मायेचे स्वरूप आहे. यास्तव अविचार-काली प्रतीत होणारे मुद्रिकात्वही मायिक आहे. विचारपूर्वक पाहू लागले असता अनुभवास न येणे हेही मायिक वस्तूचे चिह्न आहे व तेंही मुद्रिकेमध्ये आढळते. यास्तव सुवर्णाचे ठायीं मुद्रिकात्वाचा उदय व नाश हे भ्रम आहेत. भ्रमाने भासणारा पदार्थ, ज्याच्या ठायीं तो भासतो, त्या आपल्या अधिष्ठानामध्ये एक रतिभरही नसतो. शिंपेच्या ठायी रुप्याचा भास होतो.