पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. फार दिवसाच्या परिचित विषयास सोडून परत फिरत नाहीत. आता मी काय करू ? मला आपल्यावाचून कोणाचा आधार नाही. शोकशून्य निरुपद्रव व नित्य स्थान कोणते ते मला सागा. सर्व व्यवहार व सर्व लौकिक- शास्त्रीय कर्मे करीत असताना जनकादि तत्त्ववेत्ते उत्तम अवस्थेस कसे प्राप्त झाले ? ससारात राहून त्यातील पुण्यपापरूप मळाने पुरुष मळिन कसा होत नाही? कोणत्या दृष्टीचा आश्रय केल्यामुळे आपण निष्पाप झाला, व आता या लोकी जीवन्मुक्त महाशय होऊन राहिला आहा ? विषय अनुकूल कसे होतात ? क्षणभगुर वैभव शुभ कसे होते ? मोहानें कलु- पित केलेली व कामादि कलकार्ने भरलेली बुद्धि प्रसन्न कशी होते. ससा- रात यथेच्छ व्यवहार करीत असताना मनुष्य बद्ध कसा होत नाही 2 पर दुःखास स्वदुःख मानणारा व स्वदुःश्वास तृणासारिखे गणणारा पुरुष उत्तमतेस प्राप्त होतो, हे मला ठाऊक आहे. पण कोणत्या महापुरुषाचे स्मरण केले असता दुःख सह्य होते, कल्याण कशात आहे ? उचित फल कोणते ? या ससारात कसे वागावे ? कोणती वस्तु सग्राह्य आहे व त्याज्य काय आहे ? आनद कसा होईल ? निजमुखाचा लाभ करून देणारा दिव्य मत्र कोणता ? साराश, मी कृतकृत्य होऊन या शोकातून कसा पार पडेन, ते मला सागा. आपण सत व तत्त्वज्ञ महात्मे आहा. यास्तव मला उपदेश द्या. निर्जन अरण्यात निर्वल प्राण्यास हिस्र पशु जसे चोहोकडून तोडितात त्याप्रमाणे आत्मानदरहित अशा या दीनाला विकल्प तोडीत आहेत. सर्व अनर्थ करणारे मन क्षीण कसे होईल ? को- णत्या युक्तीने त्यास आपलेसे करून घेता येणे शक्य आहे, ते मला अगो- दर सागा. कारण मन शात झाल्यावाचून काहीएक होणार नाही. हे मला ठाऊक आहे. करिता माझा मोह घालवून साधूची आनदी-स्थिति मला प्त करून देण्याकरिता काही उपाय सागा. अशी जर एकादी युक्ति नसेल व ती असूनही मला कोणी न सागेल तर मी सर्वस्वाचा त्याग करणार अहकार तर पूर्वीच सोडिला आहे. आता राहिलेले अन्न, पान, वस्त्र, आभरण, स्नान, दान, शयन इत्यादिकही सोडणार. मला सपत्ति व आपत्ति भिन्न वाटतच नाहीत. मुनिराज, देहत्यागावाचून दुसरा उपायच नाही. निःशक, निर्मम व निर्मत्सर होऊन, आणि मौन धारण करून चित्राप्रमाणे निश्चल रहावे, असा माझा निश्चय झाला आहे. काही काळाने श्वासोच्छासही सोडून मी या अनर्थकर शरीरास फेकून देईन.