पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११९. म्लेच्छांमध्ये सात व्याध, राक्षसांत प्रहाद, कर्कटी इत्यादि यांसही ही ज्ञानदशा प्राप्त झाली होती व ते सदेह असताना आणि विदेह भव- स्थेतही मुक्तच भाहेत, यांत कांही संशय नाही. चित् व जड यांची प्राथ सुटणे म्हणजे यांचा तादात्म्य-अभ्यास नाहीसा होणे हेच ज्ञान आहे. तें झालें असतां मुक्ति सिद्ध असते. दुसन्या व तिसन्या भूमीत अथवा चवथ्या भूमीत, आत्मज्ञान होऊन अज्ञान-आवरणाचा भग झाला असता, योगी मोहांतून पूर्णपणे पार झालेले असतात, यांत काही शंका नाही. पण प्रबल प्रारब्धामुळे त्यांच्या चित्तांत विक्षेप होत असल्याकारणाने, त्यांस मनोनाशानतरच प्राप्त होणाऱ्या निरतिशय आनंदपूर्ण पदार्थाचा पूर्णपणे लाभ होत नाही. म्हणून आत्मलाभामध्ये परायण होऊन ते पुढच्या अवस्थांतील कोणत्या तरी एका अवस्थेत रहातात. काही योगी एकाच जन्मांत सातही भूमिकाचा क्रमाने अभ्यास करितात. कित्येक दोन किंवा तीनच भूमिकाचे उल्लंघन करू शकतात व सनकादिकांसारखे काही थोडे योगी केवळ सप्तमभूमीतच रहातात. सारांश या भूलोकी जे विवेकी जन असतात, ते या सात भूमीतील कोणत्या तरी एका भूमिकेचा अभ्यास करीत, अंतर्बाह्य विषय, इदिये, शरीर व त्या सर्वांच्या सबंधामुळे होणारे त्रिविध दुःख या सर्वांस आत्म्यामध्ये मिळविण्यास उद्युक्त होतात. इद्रियांसह मनास जिंकणे हेच ऐहिक सर्व शत्रुजयाहून अति कठीण व त्यामुळेच सर्वोत्कृष्ट कर्म होय. आणि स्वात्मसाम्राज्य हेच सर्वोत्तम स्वराज्य आहे. ब्रह्मलोकापर्यंत जेवढी उत्तमोत्तम ऐश्वर्ये माहेत त्या सर्वास तृणाप्रमाणे तुच्छ मानून जे या ज्ञान- भूमींचा अधिक अधिक अभ्यास करितात ते वंद्य होत ११८. सर्ग ११९.-मायिक रूपाचे निरसन करून पूर्वोक्क भूमिकांमध्ये सन्मात्रदर्शन स्थिर करण्याकरिता या सर्गात युक्ति सांगतात. श्रीवसिष्ठ-राघवा, सुवर्ण स्वतः सर्वदां सुवर्ण-एकस्वभाव असते. त्यामध्ये मसुवर्णतेचा गधही नसतो. पण त्याचे ठायीं मुद्रिका-भावाचा आरोप करून व स्वाभाविक सुबर्णता विसरून बाह्य मलाचा संकल्प झाल्या- मुळे हे पितळ आहे, असे समजून माझें सोनें गेलें, अमा आक्रोश करीत जसा एकादा भ्रांतिकट पुरुष रडू लागतो त्याप्रमाणे भात्मा अहंभावयुक्त