पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० बृहद्योगवासिष्ठसार. प्राप्त झालेल्या त्या योग्यास ब्रह्मविद्वर असें कचित् मणतात. या भूमीत अविद्या व तिचे कार्य यांची ससक्ति मुळीच नसते. ह्मणून तिला अससक्ति झणतात. सहावी व सातवी भूमिका या हिच्याच परिपक्क अवस्था आहेत. या पूर्वोक्त पाचही अवस्थाचा अभ्यास केल्यामुळे योगी अत्यत आत्माराम होतो. आत्म्यामध्येच ज्याचा आराम (क्रीडा) असतो व बाह्य पदार्थात नसतो तो आत्माराम होय. त्यामुळे त्यास आभ्यतर किंवा बाह्य पदार्थाची भावना होत नाही. भोजन,शयन, मूत्रोत्सर्गादि इत्यादि देहयात्रेस अवश्य असलेल्या क्रियाही त्यास दुसरा जेव्हा बराच वेळ प्रेरणा करील तेव्हा त्या त्याच्या हातून घडतात. कारण कोणी तरी पुष्कळ वेळ समजाविल्यावाचून त्यास पदार्थाचे भानच होत नाही. तो ब्रह्मविद्वरीयान् सतत आत्मानदात निमग्न असतो. ह्मणून या भूमिकेस पदार्थाभावना असें झटले आहे. या सहा भूमींचा दीर्घ काल अभ्यास केला असता साधकास भेदाचे भान होईनासे होते. दुसऱ्याने भगीरथ प्रयत्न केला तरी तो देहभानावर येत नाही. तो स्वाभाविक आत्मनिष्ठेचा अनुभव घेतो. या भूमीस तुर्यगा असें ह्मणतात. कारण जाग्रदादि व्यावहारिक तीन अवस्थाचा हिला गधही नसतो. या अवस्थेत तो स्वत. ब्रह्म होतो व त्यामुळेच त्यास ब्रह्मविद्वरिष्ठ ह्मणतात. जीवन्मुक्ताची ही शेवटची अवस्था आहे. कारण हिन्या पुढची अवस्था ह्मणजे विदेह मुक्तिच होय. ह्मणजे तेच ब्रह्म. यास्तव तिची गणना अवस्थामध्ये कारता येत नाही. रामा, जे कोणी महाभाग या सप्तम भूमिकेस प्राप्त होतात ते आत्माराम महात्मे त्या महत्पदासच पोचले आहेत, यात सशय नाही. जीवन्मुक्त सुख व दु:ग्व याच्या रसाचा आस्वाद घेत नाहीत व त्या त्या अवस्थेत ते आसक्तही होत नसतात. सहाव्या भूमीत असताना ते थोडीशी तरी स्वाभाविक कार्ये करितात व तीही सदाचाराचे उल्लंघन करून करीत नाहीत. तर जवळचा शिष्य अथवा दुसरा कोणी जे स्वाश्र- मोचित कार्य सागेल तेवढेच करितात. पण सातव्या भूमीत ते तीही करीत नाहीत. कारण निद्रित पुरुषास अतिरूपवती स्त्रियाही जशा कामी करू शकत नाहीत त्याप्रमाणे आत्माराम पुरुषास कोणत्याही प्रकारच्या जगक्रिया सुखवीत नाहीत. या सात भूमिका शुभ बुद्धिमानासच आवडतात. पशु, वृक्षादि स्थावर पदार्थ व देहच मी आहे, असे समजणारे म्लेच्छप्राय मानव यास त्याचा काही उपयोग नाही. पशूमध्ये हनुमानादि