पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पचिप्रकरणं-सर्ग ११८. र्थाभाविनी, व तुर्यगा अशी त्या ज्ञानभूमींची नावे आहेत. या भूमींच्या अती मुक्ति स्थित आहे. त्या मुक्तीमध्ये पुनः शोक करण्याचा प्रसग येत नाही. आता त्यातील प्रत्येकीचे लक्षण सागतो, तें ऐक. मी असा मूढ होऊन का बसलों आहे ? मला वेदातवाक्ये व परमगुणसपन्न गुरु याच्याशी परिचय केला पाहिजे, असे समजून मोक्षाच्या उत्कट इच्छंने विवेक, वैराग्य, शमादिसपत्ति यानी युक्त होऊन श्रवणादि साधनानुष्ठान करणे ही शुभेच्छा- नामक पहिली ज्ञानभूमि होय. शास्त्र व सज्जन याच्याशी सपर्क ठेवून व वैराग्याचा सतत अभ्यास करून गुरुशुश्रूषा, भिक्षाशन, शौच इत्यादि सदाचारांचे परिपालन करणे ही विचारणा होय विवेकादि चार साधनामह श्रवण, मनन व निदिध्यासन केल्यामुळे मन तनु ( कृश) होते. शब्द, स्पर्श, इत्यादि विषयाचे स्वभावतःच ग्रहण न होणे ही मनाच्या तनुतेची अत्य अवधि ( मर्यादा, सीमा, हद्द ) आहे. तिलाच सविकल्पसमाधि झणतात. श्रोत्रादि इद्रियाच्या योगाने शब्दादि विषयाचे ग्रहण जोवर होत असते तोवर चित्तैकाग्र्यास ध्यान ह्मणावें व शब्दादिकाचे ग्रहण होईनासे झाले की तेंच ( चित्तैकाग्र्य ) समाधि होते, असें योगशास्त्रात हटले आहे. असो, हीच तिसरी तनुमानसा भूमि होय या पूर्वोक्त तीन अव- स्थाचा अभ्यास केल्यामुळे बाह्य विषयांविषयींची सूक्ष्म संस्काररूप आस- क्तिही चित्तात न रहाणे झणजे पूर्ण विरक्ति बानणे आणि त्या विरक्तीच्या स्थैर्यामुळे शुद्ध व सत्य आत्म्यामध्ये मनाने अगदी लीन होऊन जाणे हीच मत्त्वापत्ति भूमि होय. या भूमीत गेलेल्या साधकाचे चित्त दुधात जसे पाणी मिळून जाते त्याप्रमाणे आत्म्यामध्ये त्रिपुटीरहित होऊन मिळून जाते. ही स्थिति निर्विकल्प समाधिरूप आहे व या भूमिकेस प्राप्त झालेल्या योग्यास ब्रह्मवित् ह्मणतात. या चार दशाचा अभ्यास केल्यामुळे व चित्ताचा बाह्य आणि आभ्यन्तर आकारांशी ससर्ग न होणे एतल्लक्षण समाधीचा परिपाक झाल्यामुळे चित्तात ब्रह्मात्मभाव अति दृढ होतो. पणजे निरतिशय आनद व 'नित्य अपरोक्ष ब्रह्मच मी आहे' असा साधा- स्कार दृढ होतो. आता उत्तमाधिकान्यास दुसन्या मंद व मध्यम अधिका- न्यांच्या भूमिकेतही ब्रह्मात्मसात्कार होणे शक्य आहे. पण पचम भूमीतील साक्षात्काराप्रमाणे तो द्वैतसंस्कारांच्या अत्यत उच्छेदरूप नसतो. हा स्यामध्ये विशेष माहे. माणून चवथ्या भूमीच्या शेवटी पांचव्या भूमीत