पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७८ बृहयोगवासिष्ठसार. खरे वाटते त्यास स्वमजाग्रत् झणतात. अशा प्रकारचा हा प्रत्यय देवयो- गाने देह क्षीण झाला अथवा तो अक्षत राहिला तरी पुढे अनुवृत्त होतो. हरिश्चद्राचे बारा वर्षाचे स्वप्न हे याचे उदाहरण आहे. ७ मा सहाही अवस्थाचा परित्याग केल्यावर जीवाची जी जड अवस्था रहाते तीच सषप्ति होय. पुढील दुःखाचा अनुभव घेरविणाऱ्या वासना व कमें यानी ती सपन्न असते. पहिल्या उद्भूत कर्माचा भोगानें क्षय झाला असता व पदाच्या कर्माचा उद्भव होण्यापूर्वी, अशी एक अवस्था प्राप्त होते की, त्या अवस्थेत स्थूल-सूक्ष्म-प्रपचाचा विलय होऊन त्याचे बीज अज्ञान मात्र अवशिष्ट रहात असल्यामुळे अज्ञान-उपहित आत्मा मात्र वाकी रहातो. यणन ती अवस्था अज्ञानोपहित आत्ममात्ररूप असते असो, या अवस्थेत सण. शिला इत्यादि पदार्थ कारणात लीन होऊन सस्काररूपाने असतात कारण तसे न मानिल्यास जागे झाल्यावर पुनः त्याचा उद्भव होणार नाही राघवा, याप्रमाणे मी तुला अज्ञानाच्या सात अवस्था येथे सागितल्या. त्यातील प्रत्येकीचे अनेक भेद आहेत. चक्राप्रमाणे त्याची गति एकसारखी चालते व त्या एकमेकींस दृढ करीत असतात. या सात अवस्थामुळेच जगास विचित्रता आली आहे यास्तव त्याचा त्याग अवश्य केला पाहिजे. रामा, तू उत्तम विचाराच्या योगाने आपल्या अत्यत शुद्ध चित्तात विमल आत्म्याचे दर्शन घेतलेस झणजे तुला या अज्ञान-अवस्थातून तरून जातां येईल ११७. सर्ग ११८-या सर्गात मोक्षापर्यंत सर्व ज्ञान-अवस्थांचे वर्णन करितात. श्रीवसित-रामभद्रा, आता तू ज्ञानभूमी कोणत्या ते ऐक. त्याच्या ज्ञानानंतर तू पुनरपि मोहरूपी चिखलात रुतणार नाहीस. निरनिराळे वादी योगाच्या अनेक भूमिका ठरवितात. पण मला याच शुभप्रद भूमी मान्य आहेत. अखड आत्माकार बुद्धिवृत्तीवर आरूढ झालेले ब्रह्म अज्ञा- नाची निवृत्ति करिते. यास्तव तेच ज्ञान होय व ज्याच्या विषयींचे अज्ञान निवृत्त झाले आहे असें ब्रह्मच ज्ञेय आहे, असें ह्मणतात. त्यातील ज्ञानाच्या सात भूमी असून ज्ञेय त्याच्या पलीकडे आहे. पण ज्ञेय झणजे मुक्तिच. सत्य ज्ञान व मोक्ष ही घट व कुभ याप्रमाणे एकाच वस्तुची पर्याय नावे आहेत. ज्याला सत्य बोध झाला आहे तो जीव पुनः जन्मास येत नाही. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ति, भसंसक्ति, पदा-