पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ११७. ४७७ त्यामुळेच मोठ्या थोरल्या शिळेच्या आंतील मध्यभागाप्रमाणे चित्तानें स्थिर असणे व त्याच वेळी त्याने जाड्यनिद्रारहितही रहाणे झणजे लौकिक निद्रावस्थेत नसताना चित्ताने संकल्परहित व त्यामुळेच शांत असणे हीच स्वरूपस्थिति होय. अहतेचा अत झाला असता व भेदाचा अनुभव येईनासा झाला असता जी अजडता (चैतन्य) अवशिष्ट रहाते तेंच स्वरूप किवा तोच आत्मा होय. आत्म्याचे ठायीं अज्ञानाचा आरोप होतो. आता त्याच्या सात भूमींची नावें ऐक. बीज-जाग्रत् , जाग्रत् , महा जाग्रत् , जाग्रत्स्वप्न, स्वप्न, स्वप्न-जाग्रत् व सुषुप्ति असा सात प्रकारचा मोह आहे व त्याच्या या प्रकाराचा परस्पर विविध सबध आहे. आता त्यातील प्रत्येकाचे लक्षण सागतो. १ मायाशबल चैतन्यापासून सृष्टीच्या अथवा जागराच्या आरभी प्रथमतः चिदाभास युक्त असें जें रूप बनते तेंच प्राण धारण करणे इत्यादि उपाधींमुळे पुढे प्राप्त होणाऱ्या जीवादि- सज्ञेस पात्र होते. तेच रूप पुढे सागितल्या जाणाऱ्या जाग्रत्चे बीज आहे. ह्मणून त्यास बीज-जाग्रत् असें ह्मणतात. ही ज्ञप्तीची नवी अवस्था आहे. २ या नवप्रसूत बीज-जाग्रत्च्या नंतर हा स्थूलदेह मी आहे व हे सर्व भोग्य माझें आहे, असा चित्तामध्ये उत्पन्न झालेला प्रत्यय हीच जाग्रत-संसृति होय. ३ पूर्व जन्मातील दृढ अभिमानामुळे ' तो हा मी' व 'ते हे माझें' अशा प्रकारचा जो पुष्ट प्रत्यय तीच महा जाग्रत् होय, (एकादा ब्राह्मणच इतरापेक्षा आपल्या कर्मात अथवा विद्युत जन्मतःच अधिक निपुण व आपल्या-जाती, आचार-इत्यादिकाविषयीं अधिक अभिमानी असतो. त्याचे कारण पूर्व जन्मातील अथवा याच जन्मातील दृढ अभ्यास होय.) ४ अभ्यासाच्या अभावीं दृढ न झालेलें व अभ्या- साने दृढ झालेले असे तन्मय होऊन केलेले जे मनोराज्य तेच जाग्रत्स्वप्न होय. दोन चद्र दिसणे, रज्जूचे ठायी सर्पाचा भास होणे इत्यादि सर्व भ्राती या जाग्रत्स्वप्नातच अतर्भूत होतात. ५ निद्रेच्या अतीं, निद्रेच्या ऐन भरात अथवा आरभी ज्याचा थोडा वेळ अनुभव येतो व जागे होताच ( पाहिलेला पदार्थ ) असत्य आहे, असे वाटते ते स्वप्न होय. अज्ञाच्या स्थूल शरीरामध्ये कठापासून हृदयापर्यत असलेल्या सूक्ष्म नाडी. मध्ये ते होते. पण ६ फार वेळ अनुभव आल्याकारणाने ज्या स्वप्नाचा अभिनिवेश दृढ झालेला असतो व त्यामुळे जे (स्वप्न ) जाग्रत्-प्रमाणेच