पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ बृहद्योगवासिष्ठसार. वानेच कसा रहातो व मुक्त कसा होतो तें ऐक. ब्रह्मदेवाच्या शरी- रात व्यक्त झालेली मनःशक्ति भूततन्मात्रादि क्रमाने स्थूल आकाशवाय्वा- दिरूप होऊन सकल्पानेंच मेघजलरूप होते. पुढे औषधीत प्रवेश करून तें जल प्राण्याचे गर्भ बनते. त्यानतर त्याचा जन्म होऊन ते पुरुष होते. त्याने उत्पत्तीनतर बालपणापासूनच विद्याग्रहण करावें, गुरूच्या गृही वास व गुरुशुश्रूषा करावी. पुढे पुण्याधिक्याने कर्म व ज्ञान यांमध्ये त्याने अधि- कृत व्हावे, असा जगातील सामान्य नियम आहे. त्या अधिकारी पुरुषातील तुझ्यासारख्या महा भाग्यवानास विवेक-वैराग्यादि सपत्ति अनायासाने लाभते ज्याची चित्तवृत्ति शुद्ध झाली आहे अशा पुरुषास ससार अनर्यावह असल्यामुळे त्याज्य आहे व मोक्षाचा उपाय ग्राह्य आहे, असा विवेक आपोआप होतो राघवा, अशाप्रकारचा विवेक जाग्रत् झाला ह्मणजे न्या निरभिमान व शुद्ध पुरुषाच्या केवल सत्त्वमय चित्तात क्रमाने साती योग- भूमी उद्भवतात व त्या चित्तास प्रकाशित करणाऱ्या असल्यामुळे जीवाचे परम हित होते ११६. सर्ग ११७.-अज्ञानभूमि व ज्ञानभूमि याचा विचार करितात. श्रीराम-अहो श्रेष्ठ तत्त्वज्ञ, सिद्धि देणा-या सात भूमी कोणत्या ते मला थोडक्यात सांगा. श्रीवसिष्ठ-राघवा, अज्ञानभूमीत स्थित होण्याची-स्वाभाविक प्रवृत्ति व भोगतृष्णा-ही दोन कारणे आहेत. आणि ज्ञानभूमीत स्थित होण्याची- शास्त्रीय साधनचतुष्टययुक्त श्रवणादि प्रयत्न व मोक्षाची अति तृष्णा-ही दोन कारणे आहेत. अज्ञानभूमी सात आहेत व त्यामुळेच ज्ञानभूमीही सात आहेत. त्यांतील अज्ञानभूमी तू प्रथम ऐक. नतर ज्ञानभूमींचे मी वर्णन करीन. स्वरूपामध्ये स्थित होणे हीच मुक्ति असून ' अह ' असे जाणणे हाच भ्रश होय. ज्ञत्व व अज्ञत्व याची हीच संक्षिप्त लक्षणे आहेत. राग व द्वेष याच्या अभावामुळे शुद्ध सन्मात्र तत्त्वापासून जे भ्रष्ट होत नाहीत त्याच्या ठायी अज्ञत्वाचा सभवच नाही. पण चित्स्वरूपा- पासून भ्रष्ट होऊन चित्तत्त्वास चेत्यविषयात बुडवून सोडणे, यासारखा मोह दुसरा कोणताही नाही. एका विषयाविषयींचे चितन सोडून दुसऱ्या विषयाच्या चिंतनास चित्त आरभ करीपर्यंत मध्ये जो थोडासा मननरहित अवस्थेत काल जातो तीच स्वरूपस्थिति होय. सर्व सकल्पशून्य व