पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११६. १७५ रहात नाही, सर्व आमरूप होतें; सर्वाचा परित्याग होतो; सर्व नष्ट होते व आत्म्याचे नव्हे, असे काहीं रहात नाही. (झणजे सर्व आत्म्याचे होते.) अर्थात् ते चित्त सर्वदा सर्वरूप होते. हाच परमार्थ होय, मातीची अपक्क ( क ) भाडी पाण्यात घातली असता त्याचा जसा एक गोळा होतो त्याप्रमाणे चित्त निर्मळ झाल्यावर हे सर्व बाह्य पदार्थ बोधाचा एक गोळा बनतात. त्यांचा निरनिराळा आकार व नावे याचे भान होत नाही श्रीराम-गुरुवर्य, याप्रमाणे मनाचा क्षय झाला असता सर्व सुख- दु खाचा अत होतो, असे आपण सागता खरे; पण चचल मनाचा क्षय कसा होणार? श्रीवसिष्ठ-रामा, मी आता तुला मनःशातीची युक्ति सांगतो. ह्मणजे तिच्या योगाने अतींद्रिय ब्रह्माशी तुझ्या मनाचा सबंध होईल. पूर्वी ( ९४ सर्गात ) बाराप्रकारची जीवजाति सागितली आहे. पण स्थूलदृष्टया तिचे सात्त्विक, राजस व तामस असे तीनच भेद होतात. हिरण्यगर्भाचे मनच त्या त्रिविध जीवाचे मूल कारण आहे व त्याच्या सकल्पाप्रमाणे व्यष्टि मने सकल्प करीत असतात, असेही मागे सांगितले आहे. त्यातील हिरण्यगर्भाचें मन कल्पाती लीन होते व आमच्या मनाचा स्वभावही त्याच्याप्रमाणेच असल्यामुळे त्याचाही लय होतो, असें अनु- मान करिता येते. यास्तव या अनादि ससारांतील मनाचा क्षय कसा होईल ? अशी शका घेणे उचित नाही. असो, ती मनःशक्तीच चतु- मुखाच्या शरीराच्या भावनेनें ब्रह्मदेवरूप होऊन नतर आपल्या सत्यस- कल्पाने ज्याची ज्याची कल्पना करिते तें तें होते. झणजे याप्र- माणे हे सर्व ब्रह्माडाडबर केवळ मनःकल्पनेने झाले आहे. जन्म, मरण, सुख, दुःख मोह-इत्यादिरूप आमच्या संसाराचीही कल्पना तेच करितें व कल्पभर तेच नानाप्रकारची रचना करीत राहन शेवटी आपोआप शेषशायी विष्णूमध्ये लीन होते. कल्पाच्या आरंभी उत्पन्न होऊन, कल्प- भर अनेक कल्पना करून, कल्पांती स्वकारणात लीन होणे हा याचा स्वभावच आहे. याप्रमाणे अनत ब्रह्मदेव या व इतर ब्रह्माडांतही आज- पर्यंत होऊन गेले आहेत व पुढे होतील. (ह्मणजे त्रिकाली होणाऱ्या ब्रह्मदेवाची व ब्रह्मांडांची गणना करितां येत नाही. ) पण अशाप्रकारच्या या चमत्कारिक सृष्टीत ईश्वरापासून उत्पन्न होऊन जीव 'जीवभा-