पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१.४ बृहद्योगवासिष्ठसार, सर्ग ११६-लवणाच्या कथेचा भवशिष्ट अर्थ सागून योगभूमींचा उल्लेख या ___ सात करितात. श्रीराम-प्रभो, लवणाने राजसुययज्ञाचे फल भोगिलें याविषयी प्रमाण काय ? श्रीवसिष्ठ-जेव्हा तो शाबरिक लवणाच्या सभेत आला तेव्हा मी तेथे होतो व हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. तो शाबरिक गुप्त झाल्यावर सभासदानी व राजानेही मला " हा काय चमत्कार आहे ?" ह्मणून प्रश्न केला. तेव्हा अतर्दृष्टीने सर्व सत्यार्थ जाणून मी त्यास काय सागितले ते ऐक. जे राजसूययज्ञ करितात त्याना बारा वर्षे आपत्ति भोगावी लागते. व त्या बारा वर्षांत त्यास नाना प्रकारची व्यथा होते, असा नियम आहे. यास्तव बा रामा, इद्राने लवणास दुःख देण्याकरितां त्या शबराकृति देव- दृतास पाठविले व त्या दूतानेही स्वामीच्या आज्ञेप्रमाणे राजास साठ वर्षे मानस दुःख दिलें. ( कर्त्यास शरीराने केलेल्या यज्ञाचे जितके फल मिळते त्याच्या पाचपट मानस यज्ञाचे फळ मिळावे, असा ईश्वरी सकेत आहे. यज्ञात होणाऱ्या हिसादिकाचे अनिष्ट ह्मणजे दुःखरूप फल इष्ट- फलाच्या मानाने फारच अल्प काल झणजे बारा वर्षे भोगावे लागते. अर्थात् त्या यज्ञाचे सुखमय इष्ट फल दीर्घकाल प्राप्त होते व मानस यज्ञाचे तर शारीर यज्ञाच्या पाचपट फल मिळणार हे उघड आहे. प्राण्यानी आपल्या कर्माचे अल्प फल प्रथम भोगून दीर्घफल मागून भोगावे, असाही ईश्वरी सकेत आहे, व त्यास अनुसरून येथे मानस यज्ञाचे अनिष्ट फल लवणाने साठ वर्षे भोगिले असे वर्णन केले आहे.) यास्तव हे रामा, मी हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. तेव्हा याविषयीं शका बाळगण्याचे कारण नाही. असो, साराश मनच सवे विलक्षण क्रियाचा कोव फलभोक्ता पुरुष आहे. त्यालाच रत्नाप्रमाणे घांसून अति शुद्ध करावें. उन्हाच्या योगाने दवाचा बिंदु जसा सुकून जातो त्याप्रमाणे विवेकाने चित्तास शुद्ध करून सोडावे. चित्तच सवे भूताडंबर करणारी अविद्या होय. ती विचित्रशक्तीमुळे हे सर्व उत्पन्न कारते. वृक्ष व तर हे जसे एकाच वस्तूचे वाचक शब्द ( नावें ) आहेत त्याप्रमाणे बुद्धि, जीव, चित्त, अविद्या या शब्दांच्या अर्थात अंतर नाही, असें जाणून तूं आपल्या चित्तास कल्पनारहित कर. तें निर्मल झाले असता सर्व विकल्पमय जगत् क्षीण होते. त्यानतर अज्ञात असे काही