पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११५. १७६ भारितें, खातें, जाते, वल्गना करते, निदा करते व अशाच दुसऱ्याही सर्व क्रिया करितें. देह काही करीत नाही. गृहात रहाणारा गृहाचा स्वामी अनेक चेष्टा करितो. जड गृह कांही करीत नाही. तस्मात् सर्व सुखदुः- खादि अवस्थांमध्ये मनच कर्ता, व मनच भोक्ता आहे. फार काय पण हैं मनच मानव आहे. आता याविषयी मी तुला एक उत्तम वृत्तांत सागतो. ह्मणजे लवणराजा मनोभ्रमामुळे चाडाल कसा झाला ते तुला समजेल. शिवाय मनच शुभाशुभ कमांचे फल भोगते हेही त्यावरून तुझ्या लक्षात येईल. राघवा, हरिश्चद्राच्या कुलात उत्पन्न झालेल्या त्याने एकदा एकांतांत बसून पुष्कळ वेळ मनात असा विचार केला. माझा पितामह हरिश्चद्र राजसूय- याजक होता. मी त्याच्या कुलात उत्पन्न होऊन अजून त्याच्या नावास शोभेसें काहीएक केले नाही. यास्तव आता मीही यज्ञ करीन. असा निश्चय करून त्याने सर्व मानसिक यज्ञसभार मिळविला व मोठ्या आदराने राजसूययज्ञाची मानसिक दीक्षा घेऊन ऋविजास पाचारण केले. त्या सन्मुनीचे त्याने पूजन केले. देवाचे आवाहन केले. अग्नि प्रज्वलित केला आणि उपवनामध्ये मनाने यथेच्छ यजन करीत असताना व देव, ऋषि, द्विज इत्यादिकाची पूजा करण्यात त्याचा साग्र सवत्सर गेला. शेवटी ब्राह्मणादि भूतास सर्वस्व दक्षिणा देऊन तो त्या यज्ञाचे चितन सोडून त्या दिवसाच्या अतीं आप- ल्याच उपवनात बाह्यवृत्ति झाला. त्याप्रमाणे लवण राजाने मनानेच राज- सूय यज्ञ केला व त्याचे फल मनानेच भोगिले. यास्तव चित्तच नर आहे व सुखदुःख भोगणारे आहे, असे जाणून तू त्यास पवित्र व सत्य उपायात नियुक्त कर. हे सर्व सभासदहो, मी या रामाप्रमाणेच तुह्मासही हे रहस्य सागून ठेविता ते ऐका. हा मनोरूप पुरुष पूणे वस्तूशी सगत झाल्यास पूर्ण होतो व देहादि नश्वर पदाथोशी त्याचा समागम झाल्यास तो स्वतः नश्वर व अपूर्ण होतो. यास्तव देहच मी आहे, असा ज्याचा निश्चय असेल त्याच्याशी तुझी समागम करू नका. शास्त्र व आचार्य याच्या उपदेशाने चित्त सारामार विचारयुक्त झाले असता व मी देहादि अनात्मभूत नव्हे तर परिपूर्ण परमानदरूप आहे, असा निश्चय झाला असतां सर्व दुःखें क्षीण होतात ११५.