पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिमसार खाच चमत्कारिक आहे. अहो, या अविद्यमान (मिथ्या ) अविद्येने सर्वांस भापल्या वश करून ठेविलें आहे । निर्बल तृणानें वज्राप्रमाणे कठिण होण्यासारखेंच हे सर्व दिसते. सद्गुरो, नदीप्रमाणे प्रवाहयुक्त असलेली व संसाराचें आदि कारण अशा या मायेचे स्वरूप मला पुनः चागले समजून सागा. तसाच मला आणखी एक सशय आहे. आपण सागितलेल्या त्या महाप्रभावशाली लवण राजाला ती आपत्ति का भोगावी लागली १ देह व देही याचा काष्ट व पाषाण याच्याप्रमाणे सबध झालेला असो की, दोघा मलाप्रमाणे ते एकमेकाशी भिडलेले असोत, पण त्यातील ससारी व शुभाशुभ कर्माचे फल भोगणारा कोण ? नुस्ता देह की देही ? त्याचप्रमाणे लवणास ती परम आपत्ति दाखवून तेथेच गुप्त झालेला तो ऐद्रजालिक कोण ? श्रीवसिष्ठ-बा सज्जना, देह काष्ठ किंवा भित याप्रमाणे जड आहे ? यास्तव अचेतन प असत् असा तो कर्मफल भोगण्यास समर्थ नाही. तर चिदाभासाशी तादात्म्य पावून चित्त जीव होते, व मी भोक्ता आहे, असा अभिमान धारण करिते. तोच देही, कर्मभाक्, व नानाप्रकारची शरीरें धारण करणारा होय. या चिच्छक्तिभूषित चित्तालाच जीव, अहंकार, मन इत्यादि नावे योजितात. रामा, अशाप्रकारच्या अज्ञ जीवाची ही सर्व सुखदु खे आहेत. जड शरीरास जशी ती होत नाहीत तशीच आत्मज्ञा- सही होत नाहीत. अप्रबुद्ध मन नाना कल्पना करिते व त्याप्रमाणे विचित्र आकाराचे होते. ते अप्रबुद्ध ( अज्ञ ) असेपर्यत निद्रित असते व निद्रित असेपर्यतच जगद्भमरूपी स्वप्न पहाते. गाढ अज्ञान-निद्रेत असलेल्या जीवास जोपर्यंत कोणी जागवीत नाही तोपर्यंत तो ससारभ्रमांत निमग्न असतो पण तोच जागा झाला की, त्याचे सर्व अज्ञान, व भ्रमादि भज्ञान-कार्य नष्ट होते. चित्त, अविद्या, मन, जीव, वासना व कर्मात्मा भसे ज्यास ह्मणतात तो देहीच दु.ग्वभोक्ता होय. कारण जड देह दुःख भोगण्यास योग्यच नाही. देही मात्र अविवेकामुळे दुःखी होण्यास योग्य आहे धन अज्ञानामुळे अविवेक उद्भवतो व अज्ञानच दुःखाचे कारण आहे. एका अविवेकदोषामुळेच जीव शुभाशुभ धर्माचा विषय झाला आहे. भविवेकरूपी रोगाने बद्ध झालेले मन विविध वृत्तियुक्त होऊन चक्राप्रमाणे भ्रमण करीत रहाते. या शरीरातील हे मन उत्कर्षयुक्त होतें, रडते, हंसते,