पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं सर्ग ११५. चित्ताचें अनुसंधान असेपर्यंत सृष्टीचा अनुभव व ते सुटल की, सृष्टीचा अनुभवही गेला. असा दृष्टिसृष्टि या शब्दाचा अर्थ आहे.) सृष्टीविषयींची दृष्टि केवल अज्ञानाने उत्पन्न होते व ज्ञानाने नाहीशी होते. ज्ञान्याच्या दृष्टीने पूर्वोक्त आकाशादि सर्व ब्रह्मच आहे. यास्तव तू अज्ञ होऊ नकोसा प्राज्ञ हो. ससारवासना सोड. अनात्म्याच्या ठायी आत्मबुद्धि ठेवून मूर्खा- सारखा उगीच का रडतोस ? अरे, ज्याच्या करिता तू सुखदुःखाच्या योगाने परतत्र होऊन तिरस्कारास पात्र होतोस तो हा जड व मूढ देह तुझा कोण आहे? लाकुड व दगड अथवा भाडे व बोरे याचा जरी सबध झालेला असला तरी ऐक्य नसते. त्याप्रमाणेच देह व देही (आत्मा) याचा सबध झाला आहे. पण ऐक्य नाही. लोहाराचा भाता जळला तरी त्यातील वारा जळत नाही. त्याप्रमाणे देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही. मी दुःखित आहे; मी सुखसपन्न आहे, ही मृगजळासारखी भ्राति आहे, असे जाणून तिचा त्याग कर व सत्याचा आश्रय कर. काय चमत्कार आहे, पहा. मनुष्य प्राणी सत्यास विसरून असत्याचा परम भक्त झाला आहे. पण या असत्य दृष्टीमुळेच त्याचे असे हाल होत आहेत. ससार वासनेने चित्तास जर न भरून सोडले तर जाग्रत् व स्वप्न यातील आपत्ती कशा येणार? रामा, तू वासना सोड, स्फटिकासारखा स्वच्छ होऊन रहा. आपली कर्तव्य कार्य कर. पण त्यात आसक्त होऊ नकोस, चित्राचे सानिध्य असेपर्यंत त्याच्याप्रमाणे होऊन झणजे त्याचे प्रतिबिंब ग्रहण करून ती दूर केली असता स्फटिक जसा निर्लेप रहातो स्याप्रमाणे तूंही कार्यकाली कासारिखा होऊन त्यानतर निर्लेप हो. अशारीतीने तू जर विवेकी झालास तर तुला उपमाच देता येणार नाही. तूं लोकोत्तर होशील ११४. सर्ग ११५ -या सर्गात, रामाचे बोधजन्य आश्चर्य व त्याने केलेला लवणाच्या आपत्तीविषयींचा प्रश्न व वसिष्ठाचे उत्तर याचे वर्णन केले आहे. श्रीवाल्मीकि राजा, भगवान् वसिष्ठानी असें सागितले असता रामाचे अंतःकरण प्रफुल्लित झाले. त्याच्या मुखावर एक प्रकारची उत्तम शोभा आली व तो हसत हसत असे सणाला. श्रीराम-गुरुवर्य, खरोखर आपण मला आज हे मोठे आश्चर्य सांगि- तडेत. कारण, हा सर्व प्रकार कमलतंतूनी पर्वतास बांधून ठेवण्यासार-