पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७० बृहद्योगवासिष्ठसार. खरी कालिमा नव्हे अशी तुझी भावना झाली की नाही? त्याचप्रमाणे अविद्या तिमिर आहे असें तू समज. त्याकरितांच असंकल्प हा अविद्येचा निग्रह आहे, असें ज्ञानी पुरुषानी सागून ठेविले आहे. तो स्वभावतः सुकर आहे असे वाटते, दुष्कर वाटत नाही. आकाशाच्या नीलवर्णाप्रमाणे उद्भ- वलेल्या या जगद्माचे पुनः स्मरण न करणे हेच सर्वोत्तम विस्मरण होय. स्वमात मी नाश पावलो आहे, अशा सकल्पाने पुरुष दुःखी होतो. पण जाग्रत् होऊन मी नष्ट झालेलों नाही, असे समजले असतां संकल्पानेच तो मुखी होतो. समूढ सकल्प केल्याने मन मूढ होते व ज्ञानयुक्त उदार सकल्प केला असता तेंच मन ज्ञानस्वरूप ब्रह्मभावास योग्य होते. मी अज्ञ आहे, अशी कल्पना अथवा स्मरण केले असता अनादि अविद्या व्यक्त होते. पण तिला विसरून तिचे सकल्पवासनामूल नाहीसे केले असता ती नित्य नष्ट होते. सर्व भूताचे कारण व सर्व भूतांस मोह पाडणारी अशी ती अविद्या, आत्मा परिच्छिन्न ( मर्यादित ) होऊन त्याचे अदर्शन झाले झणजे वाढते व आत्म्याचे अपरिच्छिन्न स्वरूप व त्याचे दर्शन झाले ह्मणजे स्वतः नष्ट होते. राजाची आज्ञा मत्री शिरसा मान्य करितात. त्याचप्रमाणे मन ज्याचे अनुसधान करिते तेच इद्रिये संपा- दितात. अर्थात् मनाचा निरोध केला असता इद्रियें वासनेस उत्पन्न करू शकत नाहीत. यास्तव बाह्य वस्तूविषयीं जो मनोनुसंधान करीत नाहीं त्यास ब्रह्माहभावनेने ( मी ब्रह्म आहे. या आतर भावनेने ) शाति प्राप्त होते. ज्याची उत्पत्ति झाली नाही त्याची स्थिति कशी होणार ? असा विवेक करून हे जे काही भासत आहे ते सर्व शांत, एक व अनिंद्य ब्रह्म आहे, असा निश्चय करावा. चित्तातून भोगाशा समूल उपटून टाकावी. आत्म्याचे अज्ञानच जरा-मरण-कारण आहे. माझे पुत्र, माझें धन, हा मी, हे माझे, अशा प्रकारे ही वासनाच वल्गना करीत असते. जलात वायूच्या योगाने भासणाऱ्या तरंगरूपी साप्रमाणे आत्म्यामध्ये वासनेच्या योगाने हा अहभावरूप सर्प कल्पिलेला आहे. परंतु हे तत्त्वज्ञ रामा, पारमार्थिक दृष्टया पाहिल्यास माझें व मी ही दोन्ही असत्य आहेत. आकाश, पर्वत, अतरिक्ष, पृथ्वी, नद्या इत्यादि सवे दृष्टिसृष्टीने वारवार भासते. ती अविद्याच स्वतः त्या त्या रूपाने परिणत होत असते. (पाही पर्यंत सृष्टि; पाहणे सुटले की, सृष्टिही गेली. अर्थात्